२४ मार्च २०२६ रोजी ताडेपूरा स्मशानभूमी बाबतीत मा.मुख्याधिकारी यांना खालील निवेदन
अमळनेर एक्सप्रेस न्युज
अमळनेर प्रतिनिधी नगरपरिषदेवर सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते मा.आमदार शिरीष चौधरी यांना देखील फोनवर संपर्क करून मक्तेदार व नगरपरिषद यांच्यात समन्वय करून देत लक्ष घालण्याची विनंती केली
अमळनेर नगरपरिषदेच्या ताडेपुरा सार्वजनिक स्मशानभूमी येथे काल एका निकटवर्तीयांच्या अंत्यविधीसाठी गेलो असता विदारक परिस्थिती बघायला मिळाली तेथे असलेल्या जुन्या अंत्यविधी शेडखाली असलेल्या तीनही बेड वर कालच्या एकाच दिवसात काही अंतराने अंत्यविधी झालेले होते परंतु त्या तीनही बेडचे कठडे तुटलेले असून मोठी दुरावस्था झाली आहे. तसेच त्याठिकाणी नवीन अंत्यविधी शेडचे सुरु असलेले काम देखील अपूर्ण अवस्थेत असल्याने व त्यात अंत्यविधी बेडची तरतूद नसल्याने इतर दोन अंत्यविधी खाली तात्पुरता लोखंडी सळई व तारच्या सहाय्याने बेड तयार करून करण्यात आले. या सर्व प्रकारामुळे अंत्यविधी करतांना मृताच्या नातेवाईकांना व तेथील कर्मचाऱ्यांना मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत असून त्यामुळे मृत व्यक्तीच्या शरीराची देखील अवहेलना होत असल्याचे जाणवले या बाबतीत तेथील कर्मचार्यांकडून माहिती घेतली असता नगरपरिषद व संबंधित कामाचा मक्तेदार यांच्यात किरकोळ तांत्रिक वाद सुरु असल्याची माहिती मिळाली. परंतु या सर्व प्रकारामुळे अंत्यविधी करतांना होणारी अडचण हिंदू धर्माच्या अंत्यविधी परंपरेनुसार मृताच्या नातेवाईकांना व सामान्य लोकांना प्रचंड वेदना देणारी असून अमळनेर शहराच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेला न शोभणारी आहे. तरी नगराध्यक्ष , मुख्याधिकारी यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून ताडेपुरा सार्वजनिक स्मशानभूमी येथे लवकरात लवकर सर्व सोयी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने कार्यवाही करावी अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले तसेच नगरपरिषदेवर सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते मा.आमदार शिरीष चौधरी यांना देखील फोनवर संपर्क करून मक्तेदार व नगरपरिषद यांच्यात समन्वय करून देत लक्ष घालण्याची विनंती केली यावेळी अक्षय चव्हाण , हर्षल महाजन , उज्वल मोरे हे देखील उपस्थित होते
टीप – सोबत फोटो व चित्रफित जोडलेली आहेत.
आपलाच –
शाम जयवंतराव पाटील
मा.सभापती – आरोग्य समिती अमळनेर नगरपरिषद


