मुडी येथे महात्मा बळीराजा जयंती उत्साहात साजरी.

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी

सालाबाद प्रमाणे मुडी गावात संस्कृतीचे जतन.

सालाबादप्रमाणे दरवर्षी मुडी गावात महात्मा बळीराजांच्या प्रतिमेचे पूजन मुडी गावातील ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी नाना महाजन यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले . या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी महात्मा बळीराजा विषयी महत्व विशद केले .महात्मा बळीराजाच्या राज्यात महिला शेतकरी ,कष्टकरी हे सुखाने नांदत होते. म्हणून तर भावाला बहीण ओवाळताना म्हणते, ईडा पिडा टडो बळीचे राज्य येवो म्हणून अशा कृषी सम्राट राजाची जयंती शेतकरी बांधवांनी साजरी करावी असे मत प्रकट करण्यात आले मुडी गावात कृषी संस्कृतीचे जतन म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहाने सर्व गावकरी मिळून महात्मा बळीराजाची जयंती साजरी करत असतात. गावातून महात्मा बळीराजांच्या प्रतिमेची  मिरवणूक काढण्यात आद .या कार्यक्रमाप्रसंगी मुळी गावातील लहान थोर शेतकरी कष्टकरी महिला या उत्सवात सामील झालेत कार्यक्रमाचे आयोजन किरण नाना पाटील तसेच गावातील सर्व शेतकरी बांधव मिळून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेला होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!