राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष श्याम पाटील यांचा राजीनामा             

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी                                                     मा.प्रमोदबापू पाटील
जिल्हाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार , जळगाव

विषय – शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणे बाबत…!

महाशय ,

मी श्याम जयवंतराव पाटील मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना पक्षाने माझ्या कार्यावर विश्वास ठेऊन मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अमळनेर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती आणि त्या जबाबदारीचे भान ठेऊन मी माझ्या कार्यकाळात पक्षातील सहकाऱ्यांना सोबत घेत सामान्य नागरिकांच्या हिताची कामे करण्याचा प्रयत्न करत शेतकरी – कष्टकरी – महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केली तसेच पक्ष वाढीसाठी जे जे काही चांगले व योग्य असेल ते करण्याचा प्रयत्न केला परंतु पक्षातील काही लोकांकडून मला व माझ्या सहकाऱ्यांना नेहमी अडवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अमळनेर शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असून आपण तो स्वीकारावा ही विनंती

आपला स्नेहांकित
श्याम जयवंतराव पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!