अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाची बैठक मा.आमदार डॉ. आबासाहेब डॉ.बी.एस पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाली
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक आज रोजी अमळनेर येथील शिव पेट्रोल पंप येथील संविधान सभागृहात पार पडली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष डी.एम. पाटील सर यांनी केले. बैठकीस ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, मनोहर नाना निकम, कमल आक्का,अनंत निकम,अॅड शकील काझी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बंधू – भगिनी उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व पक्ष वाढी संदर्भात आबासाहेब यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए.पाटील सर व आभार प्रदर्शन प्रशांत दादा निकम यांनी केले. 🙏🙏


