२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये योगासन प्रात्यक्षिके दाखवून त्याचे महत्त्व विषद करून तो साजरा*
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून समस्त विश्वामध्ये साजरा करण्यात येत असतो. याच महान दिवसाचे औचित्य साधून पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये योग दिवस चैतन्यमय, आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या भव्य प्रांगणात चटई अंथरून समस्त शाळेतील विद्यार्थ्यांना आसन शिकवण्यात आले. योगाचार्य योग अभ्यासक महेश माळी सर यांनी योगासने विविध प्रात्यक्षिके करून दाखविले. त्याच सोबत क्रीडाशिक्षक विनायक सूर्यवंशी व रोहन मुंदडा यांनी योग व त्याचे सकारात्मक परिणाम व दृष्टिकोन याबद्दलचे मनोगत भाव उपयुक्त स्वरूपात प्रकट केले. तसेच योगद्वारे मानवी जीवन कसे अनुकूल व सकारात्मक चैतन्यमय बनते याची अनेक नानाविध उदाहरणे त्यांनी प्रात्यक्षिक स्वरूपात प्रस्तुत करून सांगितले. मानवी जीवनात त्याचे किती उपयोगी स्वरूपात दुरगामी परिणाम कशा प्रकारचे व किती भव्य व दिव्य चैतन्यमय असतात याबद्दल सुद्धा मनोगत विचार त्यांनी प्रकट केले. चक्रासन, ताडासन भुजंगासन सूर्यनमस्कार अशा नाना विविध योगासनाद्वारे व्यक्ती सक्षम प्रबळ सशक्त तसेच एकाग्रता भाव तयार होणे, बौद्धिक क्षमतेचा विकास होणे, बौद्धिक क्षमता चतुर्य प्रबलता प्राप्त होणे तसेच व्याधी, आजार दुर्धर रोगांपासून आपणास मिळते. सक्षमता प्रदान होते चेहऱ्यावर तेज व तारुण्यमय भावछटा तयार होऊन व्यक्ती आळस झटकून तो व्यक्ती स्फूर्तीमान बनतो. त्याचे आयुर्मान वाढते. तो सकारात्मक विचार अंगीकृत करावयास लागतो. त्याची सफल व्यक्ती म्हणून समाजात गणना केली जाते.
सदर कार्यक्रमासाठी अनमोल मार्गदर्शन सहकार्य शाळेचे चेअरमन श्री. प्रदीप अग्रवाल मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही.पी. बडवे, प्रशांत वंजारी, अशोक महाजन,योगिषा महाजन, व्ही.ल. चित्ते, वैशाली भोळे ,शितल कुलकर्णी, भावना चौधरी, वृषाली बोरसे, श्वेता कलंत्री, स्वाती माळी समस्त शिक्षक वृंदवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.


