स्वर्गवासी अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय मंगरूळ विद्यालयात स्नेहसंमेलन संपन्न.
अमळनेर एक्सप्रेस न्युज.
अमळनेर प्रतिनिधी.
स्वर्गवासी अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलन आनंद भेट मोठ्या उत्साहात पार पडले .या विद्यालयातील 2006 /2007 या दहावीच्या संपूर्ण बॅच ने हे स्नेहसंमेलन आयोजित केले होते .या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष श्री दादासाहेब अशोक सूर्यवंशी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मंगरूळ येथील शिक्षिका व उपसरपंच श्रुती श्रीकांत पाटील ,श्री राजेंद्र श्रीराम पाटील ,भटू प पाटील, सीमा पाटील ,प्रवीण पाटील, मनोज पाटील, राहुल पाटील, खुशाल पाटील, प्रदीप पाटील ,तसेच श्री दादासो श्रीकांत पाटील संस्थेचे सचिव यांनी या कार्यक्रमाला शाळा उपलब्ध करून दिली व या कार्यक्रमास अनमोल असे सहकार्य केले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र श्रीराम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केला. व भूतकाळातील आठवणींना उजाळा दिली. धकाधकीच्या या जीवनात आपले सर्व जिवाभावाचे वर्गमित्र एकत्र आल्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओ सांडून वाहत होता, राजेंद्र पाटील पुढे म्हणाले की मित्र हे वनव्यामध्ये गारव्यासारखे असतात. म्हणून वर्षातून एकदा सर्व मित्रांनी एकत्र आले पाहिजे व दिवसभर असा हा आनंद उत्सव साजरी केला पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच अनेक शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब अशोक सूर्यवंशी यांनी आपले अध्यक्ष भाषण केले ..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री जगदीश मराठे, श्री पद्माकर बागुल, श्री भुषण पाटील, श्री मनोहर पाटील, सौ पल्लवी पाटील तसेच 2006/2007 च्या इयत्ता दहावीचे संपूर्ण विद्यार्थ्यांनी सहकार्य केले व अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली


