स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहाने साजरा..
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
दिनांक 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त अमळनेर शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांनी, शाळेच्या संचालक मंडळाने, तसेच प्रमुख अतिथी डॉक्टर श्री विशाल बडगुजर सर यांनी विद्यार्थ्यांसोबत योगा करून साजरा केला. विद्यार्थ्यांना योग दीन निमित्त योगा चे महत्त्व सांगण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांसमोर योगा करून दाखवण्यासाठी शहरातील प्रसिद्ध योग शिक्षक श्री गजानन माळी सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच विद्यार्थ्यांसमोर वेगवेगळे योगा प्रकार करून दाखवले व विद्यार्थ्यांकडून देखील करून घेतले . शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री नीरज अग्रवाल व शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद अमृतकर तसेच शिक्षक वृंद देखील या आंतरराष्ट्रीय योग दिवसात सहभागी झाले.

