गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुदक्षिणा म्हणून शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप*

0

अमळनेर Express news                           अमळनेर प्रतिनिधी

*गुरु ऋणातून मुक्त होण्याच्या छोटासा प्रयत्न*:-निलेश वाणी

*श्रद्धेमुळे माणसात विनम्रता येते* – वाय पी पाटील
प्रतिनिधी
साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साळवे तालुका धरणगाव येथे आज गुरुपौर्णिमेनिमित्त माजी विद्यार्थी निलेश मधुकर वाणी शहर समन्वयक नगरपरिषद धरणगाव याने शाळेतील गरीब 15 विद्यार्थ्यांना निवडून शालेय गणवेश वाटप केले व आपले पूर्व अनुभव सांगून गुरुजनांबद्दल आदर व्यक्त केला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री रामनिवास झवर साहेब उपस्थित होते. ते म्हणाले महान सपने देखने वालोके महान सपने पुरे होते है! असे अब्दुल कलाम यांनी म्हटलेलं सत्य आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी उंच स्वप्न पाहून उंची काठण्यासाठी यशस्वी व्हावे असे सांगितले.
गुरुपौर्णिमेनिमित्त धरणगाव येथील बालकवी विद्यालयाचे उपशिक्षक वाय पी पाटील हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की माणसाजवळ श्रद्धा असली पाहिजे, श्रद्धेमुळे विनम्रता येते. विद्यार्थ्यामधे श्रद्धेमुळे विनम्रता येते. समर्पण भावना ठेवल्यास ती त्यागाहून मोठी असते. गुरूंची कृपा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी विनम्र राहिले पाहिजे.
उष:काल होता होता काळरात्र झाली! अरे,पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली! असे सांगून गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करणे म्हणून मी विद्या मंदिरात आलो. कष्ट मेहनत व अभ्यासामुळे माणूस यशस्वी होतो असे माजी विद्यार्थी निलेश वाणी यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ. गिरीश नारखेडे हे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक एस डी मोरे, ज्येष्ठ शिक्षक जी व्ही नारखेडे, शिक्षिका रंजना नेहते, नीता पाटील, माजी विद्यार्थी शिक्षक किरण चव्हाण. व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त अभ्यासपूर्ण उत्कृष्ट भाषणे मराठी हिंदी इंग्रजी भाषेत केले आणि दहावीची विद्यार्थिनी तनुजा पाटील हिने सुंदर गीत गायन सादर केले.
विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी विषयात प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना निवृत्त शिक्षिका स्वर्गीय पल्लवी जोशी अग्निहोत्री यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलगा माजी विद्यार्थी भूषण प्रकाश जोशी याने रोख स्वरूपात बक्षीस दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस डी मोरे यांनी केले. ते म्हणाले ग्राम सुधारणा मंडळ व साळवे इंग्रजी विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध रंगी कार्यक्रम माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक व पंचक्रोशीतील नागरिकांच्या समवेत साजरी केले जाणार आहेत. त्यासाठी माजी विद्यार्थी व पंचक्रोशीतील पालकांनी सहकार्य करावे ही अपेक्षा व्यक्त केली. बहारदार सूत्रसंचालन व्ही के मोरे यांनी केले. आभार प्रदर्शन जी व्ही नारखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस पी तायडे, ए वाय शिंगणे, व्ही एस कायंदे, एस व्ही राठोड, बी आर बोरोले, दिगंबर पाटील, सौ प्रतिभा पाटील, वर्षा नेहेते, गुणवंती पाटील व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!