स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी गुरु द्रोणाचार्य, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव यांची भूमिका साकारून छोटाश्या नाटकाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुचे महत्त्व पटवून दिले. गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते तसेच आपले आई-वडील हेच आपले पहिले गुरु आहेत हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषणातून सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. मुख्याध्यापक श्री विनोद अमृतकर सर यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट कार्यक्रम सादर केल्याबद्दल कौतुक केले.


