स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर, 15 ऑगस्ट 2025. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे 79 वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साह व देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर डॉक्टर श्री बी आर बाविस्कर व डॉ निखिल बहुगुणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी सर्व मान्यवरांनी मानवंदना अर्पण करत राष्ट्रगान गायले.
कार्यक्रमाला डॉक्टर निखिल बहुगुणे, डॉक्टर संदीप जोशी, डॉक्टर मयुरी जोशी, शाळेचे चेअरमन श्री डी. डी. पाटील, संस्थापक अध्यक्ष श्री नीरज अग्रवाल, अध्यक्षा सितीका अग्रवाल, मॅनेजमेंट सदस्य ममता अग्रवाल व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
या निमित्ताने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांवरील नृत्याने वातावरण देशप्रेमाने भारावून गेले. संपूर्ण परिसर “वंदे मातरम्” आणि “भारत माता की जय” च्या घोषणांनी दुमदुमला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करून सुट्टी देण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद अमृतकर सर यांनी केलेल्या नियोजन व मार्गदर्शनाखाली पार पडला.

