पी बी ए इंग्लिश मीडियम स्कूल स्वातंत्र्य दिन साजर                                                                                        

0

पी बी ए इंग्लिश मीडियम स्कूल स्वातंत्र्य दिन साजरा                                                               अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी                                                              *७९ वा स्वातंत्र्य दिन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ध्वजारोहण करून व देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणात संपन्न*
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ७९वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण व तसेच इतर देशभक्तीपर गीत गायन व कार्यक्रम सादर करून उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. सकाळ मंगलप्रहरी व देशभक्तीमयपर वातावरणात उपरोक्त कार्यक्रमाचे औपचारिक सुरुवात झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे चेअरमन श्री प्रदीप अग्रवाल सर तसेच रोटरी क्लब अमळनेर शाखेचे अध्यक्ष श्री देवेंद्र कोठारी सचिव आशिष चौधरी व त्यांचे समस्त कार्यकारी संचालक मंडळ उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी शाळेमध्ये अतिशय विहंगम आकर्षक स्वरूपाची तयारी करण्यात आली होती. समस्त प्रांगण रांगोळ्या-फुलांच्या पाकळ्यांनी सुंदर स्वरूपात बनवले असून देशभक्तीपर चित्रे यांनी सज्जित करण्यात आले होते. सदर परिसर सर्वांच लक्ष वेधून घेत होता. एक वेगळाच भाव विश्वात घेऊन जाण्याचे कार्य करीत होते. राष्ट्रगान करून मान्यवर श्री प्रदीप अग्रवाल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून त्यांनी त्यास मानवंदना दिली. त्यांच्या समवेत माननीय मुख्याध्यापक जे. एस. देवरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून देशभक्त यांच्या कार्याच्या वर्णन अमोल अलंकारित वाणी केले त्यानंतर तंबाखू मुक्त भारत व अभियानाची शपथ ही समस्त सामूहिक स्वरूपात विद्यार्थ्यांना देण्यात आली.
त्यानंतर या महान दिवसाचे औचित्य साधून देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रेड हाऊस, ग्रीन हाऊस, येलो हाऊस, ब्लू हाऊस अशा चार विभागामध्ये ही उपरोक्त स्पर्धा घेण्यात आली होती. परीक्षक म्हणून ज्येष्ठ संगीत तज्ञ, ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद सोनवणे उपस्थित होते.
सोबत आज महान दिवसाचे वेगळेपण म्हणजे कवायत संचालन करून ध्वजास मानवंदना देण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी अनमोल मार्गदर्शन सर्वतोपरी सहाय्य शाळेचे चेअरमन श्री प्रदीप अग्रवाल, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका एम. एस. बारी, प्रशांत वंजारी, अनंत बागल, योगिषा महाजन व समस्त शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.
धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!