*पी.बी.ए. इंग्लिश मिडियम स्कुल जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत विजयी. जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त.*

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी
जळगाव येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय वर्ष वयोगट 14 वर्षे मध्ये, अमळनेर पी.बी.ए. इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातुन द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून सदर विद्यार्थ्यांना जळगाव जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. सदर 14 वर्षे वयोगटांमधील उपरोक्त सहभागी विद्यार्थी दीप कमलेश विसपुते, पियुष श्रावण पाटील, गौरव साहेबराव चौधरी, आयान पठान, स्वराज शिरसाठ
या खेळाडू विद्यार्थ्यांनी चमकदार, चुणूकदार व चपळता दाखवुन उपरोक्त उत्कंठावर्धक वाढविणाऱ्या चुरशीच्या सामन्यात जिल्ह्यातुन द्वितीय क्रमांक प्राप्त केला. शाळेच्या गौरवशाली, ऐतिहासिक परंपरेत मानाचा तुरा रोवला व आपल्या कौशल्य व खेळाने सर्वांना अचंबित व प्रभावित केले. मान्यवर परीक्षकांनी त्यांना भविष्याबद्दल व त्यांच्या प्रगतीबद्दल शुभ आशीर्वाद व सदिच्छा दिल्या सदर विद्यार्थ्यांना खेळाचे कौशल्य व तंत्रशुद्ध मार्गदर्शन रोहन मुंदडा, विनायक सूर्यवंशी यांचे लाभले.
सदर विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन सहकार्य शाळेचे चेअरमन श्री प्रदीप अग्रवाल, मुख्याध्यापक जे.एस.देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका एम एस बारी, व्ही.पी. बडवे, प्रशांत वंजारी, वर्षा पवार, योगिषा महाजन समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!