सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान*

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी
दि.17 सप्टेंबर 2025 रोजी कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे दि. 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 सेवा पखवाडा उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता ही सेवा भावना रूढ व्हावी म्हणून महाविद्यालयातील परिसरात स्वच्छता मोहीम, प्लास्टिक मुक्त थर्माकोल, मुक्त कचरा मुक्त जनजागृती याबरोबरच प्लास्टिक संकलन असे उपक्रम राबविण्यात आले.
स्वच्छता ही सेवा या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी उपस्थिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर उपक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील अनेक स्वयंसेवक सहभागी झाले.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी, राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.नंदा कंधारे,प्रा. विजय पाटील, प्रा .डॉ. दिलीप कदम, प्रा. डॉ . माधव वाघमारे,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा. डॉ. देवदत्त पाटील, प्रा.डॉ. पवन पाटील, प्रा. डॉ. संजय पाटील, प्रा.डॉ. संजय महाजन, श्री. जगदिश साळुंखे, डॉ.सचिन पाटील, श्रीमती. मंजुषा गरूड,श्री. शाम पाटील, श्री. दिपक पाटील,श्री.सचिन साळुंखे, श्री. दिलीप चव्हाण,श्री.अतुल साळुंखे प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!