मसाप अंमळनेरच्या वतीने संत साहित्याचा जागर- संत जगनाडे महाराज- कविवर्य बी एन चौधरी

0

अमळनेर एक्सप्रेस न्युज

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर प्रतिनिधी . आज मांडळ येथे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे,शाखा अमळनेर व आप्पासाहेब चैत्राम पाटील सार्वजनिक वाचनालय मांडळ यांचे संयुक्त विद्यमाने एकादशीच्या पावण दिवशी आयोजित कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संदीप बाबुराव घोरपडे अध्यक्ष म.सा.प.अमळनेर आणि श्री.दिपक बडगुजर,व ज्येष्ठांनी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.मांडळ येथील विठ्ठल मंदिर चौकात संत साहित्याच्या जागर अंतर्गत कार्यक्रमाचे प्रास्ताविकात श्री.भाऊसाहेब देशमुख यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याची माहिती सांगितली.अमळनेर शाखेच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची मांडणी केली महाराष्ट्राने संत परंपरा का स्वीकारली. आणि तीची नवीन पिढीला प्रेरणादायी ठरावी म्हणून कशाप्रकारे प्रयत्न झालेत यावर भर देण्यात आला प्रमुख वक्ते कविवर्य बी.एन.चौधरी यांनी संताचे जीवन कार्याची महती सांगितली की संत ज्ञानेश्वर माऊली यांनी जगाला पसायदान दिले.संत तुकाराम महाराजांनी समाजाला दिशादर्शन करण्याचं काम केले व आपल्या शब्दांनी साहित्याला समृद्ध केले जगनाडे महाराज हे तुकाराम महाराजांचे लेखनीकाचे कार्य केले.त्यांच्या कुटूंबात वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता.त्यांच्या आधिच्या पाच पिढ्यांपासून चाकण पुणे ते पंढरपूर येथे वारी ची परंपरा होती.संत जगनाडे महाराजांची सोळाव्या वर्षी भेट झाली.आणि ते संत तुकारामांचे शिष्य झाले.ते तुकारामांचे चौदा टाळकरी मधील पहिले महत्त्वाचे टाळकरी होते.संत जगनाडे महारांजानी संत तुकाराम महाराजांच्या गाथा, अभंग पुनर्जिवीत केले.आपणपण आपला भुतकाळ न विसरता भविष्याची वाट धरूयां.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.संदिप घोरपडे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने महिला, तरुण पिढीचे, जेष्ठ नागरिकांचे, प्रश्नांसाठी मार्ग मिळेल असे आश्वासनही दिले..संत जगनाडे महाराजांचे त्रिगुणात्मक विचार स्पष्ट केले.सदर कार्यक्रमात डॉ.अशोक पाटील, विजय पाटील, नरेंद्र निकुंभ,अनिल शेठ, प्रेमचंद पाटील,सुरेश कोळी, संजय धनगर, जयवंत गोसावी, सिताराम कोळी.गोकुळ बागुल, दिनेश नाईक, निरंजन पेढांरे,दयाराम पाटील, बापूराव ठाकरे राहुल पाटील हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.मनोहर नेरकर यांनी केले.सौ.सुनिता पाटील यांनी पसायदान सादर केले.आभार श्री.उमेश काटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!