अमळनेर तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांनी रसिकांची मने जिंकली
अमळनेर एक्सप्रेस न्युज
अमळनेर प्रतिनिधी
शिक्षण विभाग ,पंचायत समिती अमळनेर , अमळनेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ व पीबीए इंग्लिश स्कूल अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” या विषयांतर्गत पाच उपविषयांवर आधारित तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी .*रोटरी हॉल, पीबीए इंग्लिश स्कूल ,अमळनेर* येथे संपन्न झाली.
अमळनेर तालुक्यातील एकूण 10 शाळांनी या विज्ञान स्पर्धेत सहभाग नोंदवला.या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले . स्पर्धकांना “मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. रमेश माने (मराठी विभाग प्रमुख, प्रताप महाविद्यालय,अमळनेर),प्रा. ज्ञानेश्वर पाटील (नाट्यशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय,अमळनेर) यांनी कामकाज पाहिले.
सदर कार्यक्रमासाठी पीबीए इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक जिजाबराव देवरे, डी.आर. कन्या शाळेच्या उपमुख्याध्यापिका सुरेखा बाविस्कर, तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे ,सदस्य नंदा पाटील, भाग्यश्री वानखेडे,सोपान भवरे, दिनेश पालवे, माधुरी पाटील, स्वाती माळी, श्वेता पवार, संजय पाटील, प्राजक्ता शिंदे, एन. डी. पाटील, वैशाली पाटील, आकाश पाटील,संदीप शिरसाठ यांच्यासह तालुक्यातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी पीबीए इंग्लिश स्कूल चे चेअरमन प्रदिप अग्रवाल, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक जिजाबराव देवरे, डी. आर. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सिमा सूर्यवंशी ,रोटरी क्लब अमळनेर चे चेअरमन ,सर्व रोटरीयन यांचे विशेष सहकार्य लाभले. या विज्ञान नाटयोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक-काजल योगेश गुरव व समूह(शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे) द्वितीय क्रमांक-देवेंद्र कमलाकर पाटील व समूह(विजय नाना पाटील आर्मी स्कूल, अमळनेर),तृतीय क्रमांक-स्वाती प्रताप पाटील व समूह(पं.नेहरू माध्य.विद्यालय, फाफोरे) यांनी तर उत्तेजनार्थ क्रमांक तपन प्रकाश पाटील व समूह (साने गुरुजी विद्यालय, अमळनेर व नित्या गणेश पाटील व समूह (पीबीए इंग्लिश स्कूल, अमळनेर)यांना देण्यात आला.जिल्हास्तर स्पर्धेसाठी फक्त प्रथम क्रमांकाचा समूह नाट्य सादरीकरण साठी जाईल.
स्पर्धेनंतर विद्यार्थी, शिक्षक यांची मनोगते झाली, इंस्पायर अवॉर्ड साठी निवड झालेल्या टाकरखेड्याची विद्यार्थीनी धनश्री योगेश पाटील हिचा विशेष सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी परीक्षक प्रा. डॉ. रमेश माने यांनी निकाल घोषित केला त्याआधी त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयांचा विज्ञानाशी कसा संबंध आहे,याचे विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन पेंढारे यांनी तर आभार नंदा पाटील यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण विभाग,अमळनेर चे प्रमोद पाटील,देवेंद्र पाटील विज्ञान मंडळाचे पदाधिकारी तसेच सर्व सहकारी शिक्षक यांनी परिश्रम घेतले.


