मारवड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा*.—

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी

कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘ राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला. सुरूवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजनेचा हेतू आणि युवा या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचेअध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.व्हि. डी. पाटील यांनी भुषविले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी समाज सेवेतून राष्ट्राची सेवा करावी. यासाठी ग्राम स्वच्छता, प्लास्टिक मुक्ती, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम राबवावे. स्वच्छता ही सेवा महात्मा गांधी यांनी दिलेला संदेश आत्मसात करून परीसर,गाव स्वच्छ ठेवावे असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून स्वयंसेवकांना दिला. राष्ट्रीय सेवा योजना महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.नंदा कंधारे यांनी विद्यार्थ्यांना रा.से.योजनेच्या नियमित कार्यक्रमाविषयी माहिती दिली व राष्ट्रीय सेवा योजना स्थापनेचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला.कार्यक्रमाचे आभार प्रा. विजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा.डॉ. पवन पाटील,प्रा.डॉ. माधव वाघमारे, श्री. जगदीश साळुंखे, श्रीमती मंजुषा गरूड व इतर शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!