पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध : पत्रकारांचा संताप- हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी *
अमळनेर Express news
अमळनेर (प्रतिनिधी)- त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या योगेश खरे , अभिजीत सोनवणे आणि किरण ताजणे या पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या भीषण हल्ल्याचा अमळनेर (शाखा ) जि.जळगांव आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना *व्हॉईस ऑफ मिडिया* तर्फे तीव्र निषेध करण्यात आला. याबाबत तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पत्रकारांवरील वारंवार होणाऱ्या हल्याविषयी संघटनेतर्फे संताप व्यक्त करत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी व्हाईस ऑफ मिडिया चे प्रदेश सरचिटणीस डॉ डिगंबर महाले, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मिलिंद ठोके व जळगांव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ठळकपणे मांडण्यात आला. पत्रकार हा समाजाचा कणा आहे. सत्य आणि न्यायासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पत्रकारांवर होत असलेले हल्ले ही लोकशाहीला काळीमा फासणारी बाब आहे. पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही.दोषींवर या कायद्यान्वये तातडीने कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा पत्रकारांच्या सुरक्षितेसाठी मोठा संघर्ष उभारण्यात येईल पत्रकारांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. अश्या प्रकारची निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे यांनी पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध करत आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्यात. हल्लेखोरांना तातडीने अटक करून पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कठोर कारवाई करावी. राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबविण्यात याव्यात, भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी शासनाने ठोस व कडक धोरण आखावे आदी मागण्यांही यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष उमेश धनराळे, जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, तालुकाध्यक्ष उमेश काटे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बापूराव ठाकरे, साप्ताहिक विंगचे जिल्हा उपाध्यक्ष अजय भामरे, शहराध्यक्ष जयवंत वानखेडे, सचिव जितेंद्र पाटील, कोषाध्यक्ष रवींद्र मोरे, मिलिंद पाटील, सहसचिव ईश्वर महाजन, शरद कुलकर्णी, दयाराम पाटील, रजनीकांत पाटील, उमाकांत ठाकूर, कमलेश वानखेडे, दिनेश नाईक, चंद्रकांत निकुंभ, विशाल मैराळे, शामकांत पाटील, किरण चव्हाण, बी.एल. पाटील आदी उपस्थित होते.

