एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त एक दिन, एक घंटा, एक साथ राष्ट्र स्वच्छता अभियान*
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, महाराष्ट्र शासन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,” स्वच्छता ही सेवा” अभियान 2025 या कार्यक्रमांतर्गत आज दि.25 सप्टेंबर 2025 रोजी एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ “राष्ट्र स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
महाविद्यालयात स्वच्छता अभियान राबवून प्लास्टिक मुक्त परिसर करण्यात आला. “एक दिन, एक घंटा, एक साथ” राष्ट्र स्वच्छता अभियानांतर्गत “स्वच्छता ही सेवा” शपथ उपस्थितांना देण्यात आली. स्वच्छता अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले.सदर अभियानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले व उपप्राचार्य डॉ.व्हि.डी.पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
सदर अभियानाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी, राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.नंदा कंधारे,प्रा. विजय पाटील, प्रा. डॉ . माधव वाघमारे,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा. डॉ. देवदत्त पाटील, प्रा.डॉ. पवन पाटील, प्रा. डॉ. संजय पाटील, प्रा.डॉ. संजय महाजन, श्री. जगदिश साळुंखे, डॉ.सचिन पाटील, श्रीमती. मंजुषा गरूड,श्री. शाम पाटील, श्री. दिपक पाटील,श्री. दिलीप चव्हाण,श्री.अतुल साळुंखे प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

