अहिराणी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी : अमळनेर येथे खान्देश साहित्य संघाची सभा

0

अमळनेर  Express news

अमळनेर- अहिराणी बोलीभाषा ही अतिशय पुरातन असून इ. स. पूर्व तीन हजार वर्षाचा इतिहास आहे. ही भाषा समृद्ध असून तिला मराठी भाषेप्रमाणेच अभिजात भाषेचा दर्जा मिळणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत खान्देश साहित्य संघ, महाराष्ट्र चे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी व् साहित्य संघाची विशेष सभा उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष शरद धनगर, जिल्हा सचिव उमेश काटे व जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर यांची उपस्थिती लाभली. सभेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजनाने झाली. त्यानंतर डॉ. मिर्झा बेग यांच्यासह ज्ञात–अज्ञात साहित्यिक व कवींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी विविध साहित्यिक, भाषिक आणि संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर करून नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी वाल्मिक मराठे, कुणाल पवार, रजनी पाटील, रेखा मराठे, सुनीता पाटील, रत्नाकर पाटील, गोपाल हडपे, दत्तात्रय सोनवणे, मनोहर नेरकर, शरद पाटील, विशाल देशमुख, चंद्रकांत पाटील, पूनम साळुंखे, रूपाली पाटील, प्रतिभा पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान सभेतील उपस्थित साहित्यिकांनी खान्देशी संस्कृती, लोकपरंपरा, बोली संवर्धन व भविष्यातील साहित्यिक उपक्रम यावर सकारात्मक मते व्यक्त केली. अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी व्यापक जनजागृती, अभ्यास, संशोधन व शासकीय पातळीवर निवेदन देण्याचा ठराव सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी उमेश काटे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. सुनीता पाटील यांनी आभार मानले.

 

जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जळगाव जिल्हा उर्वरित कार्यकारिणी अशी उपाध्यक्ष- डी. ए. धनगर, उपाध्यक्ष-रजनी पाटील, कार्याध्यक्ष- वाल्मीक मराठे, कोषाध्यक्ष- रमेश धनगर, प्रसिद्धी प्रमुख- निरंजन पेंढारे, कार्यवाह- गोकुळ बागुल, कार्यवाह- मनोहर नेरकर, संघटक म्हणून रत्नाकर पाटील (अमळनेर), किशोर पाटील (चोपडा), आशा सोनवणे, (जळगाव), डॉ. सुवर्णा पाटील (भडगाव), सदस्य- रामकृष्ण बाविस्कर, रामेश्वर भदाणे, पूजा पाटील, कल्पना पाटील, मार्गदर्शक /सल्लागार म्हणून डॉ. डिगंबर महाले, कृष्णा पाटील, हिरामण कंखरे, सुभाष पाटील- घोडगावकर यांचा समावेश आहे.
————-
अमळनेर – नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देताना केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी. शेजारी शरद धनगर, उमेश काटे व डी. ए. धनगर, कुणाल पवार आदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!