*पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचा 48 वा वार्षिक स्नेहसंमेलन इंद्रधनुष्य रंग उधळीत व कलाविष्कार सादर करीत उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न*

0

अमळनेर Express news

अमळनेर नगरीतील शैक्षणिक वैभवशाली परंपरा जपणारी, राखणारी संस्था म्हणजे पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे प्रेक्षक व दर्शक व पालकांसाठी आनंदाची अनुभूती देणारी एक पर्वणी ठरत असते. या विद्यालयाचे 48 वे वार्षिक स्नेहसंमेलन दोन दिवसीय स्वरूपात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना त्यांना चतुरस्त्र सूप्त गुणांना वाव देणारा हा ठरत असतो. ज्याप्रमाणे चातक पक्षी पर्जन्यमानाची वाट पाहत असतो त्याप्रमाणे शाळेचे समस्त विद्यार्थी या स्नेहसंमेलनाची वाट बघत असतात. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात खानदेश शिक्षण मंडळाचे समस्त पदाधिकारी कार्यकारी संचालक मंडळ व मान्यवर उपस्थित अतिथी यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा हा पार पडला. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री विनोद जे. अग्रवाल, उपाध्यक्ष श्री. कमल कोचर, खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष श्री निरज डी अग्रवाल, कार्योपाध्यक्ष श्री जितेंद्र जैन खानदेश शिक्षण मंडळाचे कार्यकारी मान्यवर संचालक मंडळाचे सदस्य श्री प्रदीप अग्रवाल, श्री हरी भिका वाणी, श्री योगेश मुंदडे, पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष डॉ.श्री संदेश गुजराथी, श्री पंकज मुंदडे, सौ. लीना पाटील, संस्थेचे सचिव प्राध्यापक पराग पाटील, पदसिद्ध प्राचार्य प्राध्यापक डॉ. श्री एच.डी. जाधव व शिक्षक प्रतिनिधी राहुल पाटील हे उपस्थित राहून कार्यक्रमाची उंची व शोभा एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवली. तसेच स्नेहसंमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून आपल्या शाळेची ज्येष्ठ विद्यार्थिनी व नामांकित स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सौ सोनल प्रसाद चेडे (महाजन) या होत्या.या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेची पूजन दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्याचबरोबर परमपूज्य साने गुरुजी श्री पुसालाल बालचंद अग्रवाल व श्रीमंत प्रताप शेठजी या महान विभूतींच्या प्रतिमेस वंदन करून माल्यार्पण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वर्षाची स्नेहसंमेलनाची संकल्पना एक आगळीवेगळीच तसेच मानवी मनाचा व गुणांचा वेध घेणारी म्हणजेच या कलाविष्कार कार्यक्रमास तरंग असे नाव देण्यात आले होते. तरंग नृत्याचा, तरंग कलेचा, तरंग नाट्य अभिनयाचा या संकल्पना द्वारे कार्यक्रम अंतरंग तृप्त अनुभूती सर्व प्रेक्षकांना घडवून आणत होता. या नृत्य नाट्यविष्कार मध्ये सामूहिक स्वरूपातील लोक नृत्य लोकगीत जुने नव्या गाण्यांवरील नृत्य ऐतिहासिक महानाट्य तसेच सामाजिक जनजागृती व प्रबोधन करणारे नाटिका समाविष्ट होत्या. तसेच याच कालखंडामध्ये फ्लॉवर डेकोरेशन, बिस्कीट डेकोरेशन, रांगोळी स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांचे अप्रतिम चित्रांचे व तयार केलेल्या कलाकृतींचे आर्ट गॅलरी तयार केली जाते. जे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा मंच या कलाकृतीतून दिला जातो. एक सच्चा कलाकार या समाजासमोर यावे ही भावना विद्यालयाची असते. यामध्ये परीक्षक म्हणून ॲडवोकेट भारती अग्रवाल, सुरेखा बाविस्कर, शितल सावंत व योगेश पाटील सर हे होते. तसेच माननीय मुख्याध्यापक जे. एस. देवरे यांनी वर्षभरात शाळेमधील विद्यार्थ्यांच्या प्राप्त केलेला सन्मानाची पुरस्काराची तसेच उल्लेखनीय कार्यावर प्रकाश हा वार्षिक अहवालातून टाकला. सदर कार्यक्रमासाठी अनमोल मार्गदर्शन सहकार्य सर्वतोपरी मदत शाळेचे चेअरमन श्री. डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे,पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी व्ही.जी. बोरोले, व्ही.पी. बडवे, प्रशांत वंजारी, योगिनी ओवे, भावना चौधरी, योगिता पाटील, प्रतिमा ठाकूर, व्ही.एस. अमृतकर, योगिशा महाजन, अनंत बागल, प्रिया शहा, करिष्मा जैन, विनायक सूर्यवंशी समस्त शिक्षक वृंद व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!