अमळनेर तालुका को ऑप फ्रुट सेल सोसायटीची निवडणूक बिनविरोध
अमळनेर Express news
86 वर्षे जुनी असलेल्या संस्थेत 13 जागासाठी 31 जणांची माघार
अमळनेर – येथील अमळनेर तालुका को ऑप फ्रुट सेल सोसायटी च्या सन 2026 ते 2031 या करिता सुरु असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 13 जागासाठी सुमारे 44 जणांनी नामांकन अर्ज दाखल केले होते, मात्र 31 जणांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस पी महाजन यांनी दिली. सुमारे 86 वर्षे जुनी असलेल्या संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने खऱ्या अर्थाने “बिना सहकार नाही उद्धार” या उक्तीचा प्रत्यय आला आहे.
या संस्थेत सर्वसाधारण प्रवर्गातील आठ जागासाठी जयेशकुमार प्रतापराव काटे (कोळपिंप्री), नंदकिशोर अरुण नेरकर (कन्हेरे), भागवत पंडीत पाटील (पाडळसे), प्रताप आत्माराम पाटील (फाफोरे बु.), प्रफुल्ल भिका पाटील (कोळपिंप्री), पुरुषोत्तम सुभाष पाटील- सुर्यवंशी (कंडारी), शामकांत बळीराम पाटील (गोवर्धन), युवराज आत्माराम पाटील (बोहरा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महिला प्रवर्गातून मंगलाबाई लोटन चौधरी (निंब) व सुवर्णा अनिल पाटील- अहिरराव (बोहरा), इतर मागास प्रवर्गातून सुरेश पिरन पाटील (निंभोरा), अनुसूचित जाती – जमाती वर्गातून हिलाल छन्नू सैंदाणे (निंब), भटक्या विमुक्त प्रवर्गातून ज्ञानेश्वर गरबड धनगर (बोहरा) यांची ही बिनविरोध निवड करण्यात आली. शेतकऱ्यांची हित जोपासणारी ही संस्था बिनविरोध व्हावी जेणेकरून संस्थेवर निवडणुकीच्या खर्चाचा विनाकारण भार पडणार नाही. यासाठी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिताताई वाघ, जेष्ठ नेते डॉ अनिल शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. या पार्श्वभूमीवर समन्वय समितीतील प्रा. शाम पवार, प्रा. सुभाष सुकलाल पाटील, संजय पुनाजी पाटील, नीलकंठ पाटील, भास्कर चौधरी, कामराज पाटील, बाळासाहेब पाटील, उमेश काटे, लहू पाटील यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार्य केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी आमदार डॉ बी एस पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, नगरसेवक डॉ डिगंबर महाले यांनी अभिनंदन केले आहे.

