व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या घ्यान उपक्रमाला दिवशी प्रतिसाद
अमळनेर Express news
पाचव्या दिवशी सरिता कौशिक, राणा सूर्यवंशी, रश्मी मारवाडी यांची उपस्थिती.
मुंबई :‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ आणि ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ या दहा दिवसीय ध्यान उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज पाचव्या दिवशी साडे तीन हजार पत्रकारांनी त्यांच्या कुटुंबियांसह यात आपला सहभाग नोंदवला.
गुरुदेव श्री. श्री. रविशंकर ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’चे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सलील पुळेकर,‘ सरिता कौशिक संपादक, ए बी पी माझा , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राणा सूर्यवंशी महिला विंगच्या अध्यक्ष रश्मी मारवाडी यांची उपस्थित होत्या.
यावेळी गुरुदेव श्री. श्री. रविशंकर यांनी मार्गदर्शन केले. तर सुरुवातीला सरिता कौशिक संपादक, ए बी पी माझा म्हणाल्या की, आजचा पत्रकार हा केवळ बातमी देणारा दुवा नाही, तर समाजाच्या वेदना, संघर्ष आणि आशा यांचा साक्षीदार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या असोत, नैसर्गिक आपत्ती असो किंवा सामाजिक अस्थिरता, प्रत्येक वेळी पत्रकार घटनास्थळी उभा असतो. अशा वेळी भावनिक, मानसिक आणि शारीरिक ताण हा अपरिहार्य ठरतो. त्यामुळे पत्रकारांनी आपल्या आरोग्याची, विशेषतः मानसिक संतुलनाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
ध्यान, प्राणायाम आणि नियमित आरोग्य तपासणी या केवळ वैयक्तिक सवयी नाहीत, तर व्यावसायिक जबाबदारीचाच एक भाग आहेत. निरोगी पत्रकारच निर्भीड आणि वस्तुनिष्ठ पत्रकारिता करू शकतो. मन शांत आणि स्थिर असेल तर निर्णयक्षमता अधिक प्रभावी होते, संवेदनशील विषय हाताळताना संतुलन राखता येते आणि समाजासमोर सत्य अधिक जबाबदारीने मांडता येते.
माध्यम क्षेत्रात स्पर्धा, वेग आणि सततचा दबाव यामुळे ताण वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत संस्थात्मक पातळीवरही पत्रकारांसाठी आरोग्यविषयक उपक्रम राबवणे आवश्यक आहे. ध्यान शिबिरे, समुपदेशन, ताण-तणाव व्यवस्थापन कार्यशाळा यांचा पत्रकारांना मोठा फायदा होऊ शकतो. पत्रकारांचे आरोग्य सुरक्षित राहिले तरच लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक भक्कम राहील, असा माझा ठाम विश्वास आहे.
यावेळी बोलतांना राणा सूर्यवंशी म्हणाले की,
पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना पत्रकार यांना रोज समाजातील वेदना, अन्याय, संघर्ष आणि अस्थिरतेचा सामना करावा लागतो. या सततच्या धावपळीत आणि मानसिक तणावात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणे ही सामान्य बाब बनली आहे. मात्र आता ही सवय बदलणे काळाची गरज आहे.ध्यान, प्राणायाम आणि मनःशांतीचे तंत्र हे पत्रकारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. शांत मनामुळे विचार अधिक स्पष्ट होतात, भावनिक संतुलन राखता येते आणि संवेदनशील घटनांचे वार्तांकन करताना संयम ठेवता येतो. निरोगी शरीर आणि स्थिर मन हेच प्रभावी पत्रकारितेचे खरे आधारस्तंभ आहेत.
माध्यम क्षेत्रात कार्यरत प्रत्येकाने मानसिक आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. संस्थांनीही पत्रकारांसाठी आरोग्यविषयक उपक्रम राबवून एक सकारात्मक आणि समर्थ कार्यसंस्कृती निर्माण करावी. पत्रकार सक्षम असेल तरच समाजासमोर सत्य सक्षमपणे उभे राहू शकते. यावेळी महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी यांनी घ्यान साधनेला घेवून त्यांचे अनुभव सांगितले. मोठा प्रतिसाद आजच्या सत्राला मिळाला.

