शिक्षण विस्तार अधिकारी संघटना अध्यक्षपदी विजय पवार

0

अमळनेर  Express news

अमळनेर प्रतिनीधी

जळगाव येथील पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी ,तसेच विद्यमान ग .स सोसायटीचे संचालक ,विजय शांतीलाल पवार यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटना नाशिक विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .राज्याध्यक्ष कैलास सांगळे नाशिक व राज्य सरचिटणीसपदी, दादाराव मुसद वाले बुलढाणा यांनी नुकतीच ही निवड जाहीर केली .शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांच्या निवडीबद्दल प्रगती पॅनलचे रावसाहेब पाटील व सहकार पॅनलचे उदय पाटील यांच्यासह सर्व जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकारी ,शिक्षण अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक ,शिक्षक या सर्वांनी अभिनंदन केले आहे .यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी पवार म्हणाले की ,आपण शिक्षण विस्तार अधिकारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. पवार यांनी जळगांव, धुळे ,नंदुरबार ,येथील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!