पाणी टंचाईवर मात करण्याच्या उपाययोजनांऐवजी* *मंत्री अनिल पाटलांचा घोषणांचा मुसळधार पाऊस* _प्रा.अशोक पवार_
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
अमळनेर Express news
अमळनेर तालुका अवर्षण प्रवण क्षेत्र असताना व प्रचंड पाणीटंचाई असताना तालुक्यातील १३३ गावांमध्ये २०१९ पासून जलजीवन मिशन योजनेत ११२ कोटींची कामे सुरू आहेत परंतु अद्याप पाच वर्षात निधी अभावी केवळ ५० ते ५५ टक्केच काम झाले हे सत्य दैनिक लोकमतने उघडकीस आणले .हे मंत्री अनिल पाटील यांचे अपयश आहे.१९७ कोटीची पाणीपुरवठा योजना हा ही निवडणूक जुमलाच आहे .पाडळसे धरणासाठी शंभर कोटी मिळत नाही,धरणात पाणी नाही आणि १०१० कोटीची शासन खर्चातून पाच उपसा सिंचन योजनेची निविदा काढणे ही पण जनतेची दिशाभूल आहे.
ताडेपुरा तलावासाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पोकळ घोषणा केली होती. त्यांनाही दहा वर्षात काहीही करता आले नाही. ताडेपुरा तलावासाठी आज पाच कोटी १७ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता ही बातमी वाचली .एक कोटी नगरपरिषद अंमळनेर कुठून देणार? प्रशासकीय मान्यता म्हणजे पैसे मिळाले असे नाही .पाडळसे धरणाची ४८९०.७७ कोटीची प्रशासकीय मान्यता आहे परंतु पैसे मिळाले नाही. मंत्री अनिल पाटील हे विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना गाजर दाखवीत आहेत असे परखड मत पाणी प्रश्नाचे अभ्यासक प्रा अशोक पवार यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केले. असे मत प्राध्यापक अशोक पवार सर यांचे आहे

