करणखेडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा समारोप*…—

0

अमळनेर Express news
मारवड ता. अमळनेर येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे एनएसएस दत्तक गाव करणखेडा येथे दि. 25 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विशेष संस्कार शिबिराचा समारोप झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. आबासो. देविदास शामराव पाटील (उपाध्यक्ष ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड) हे होते.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय आबासो. श्री. जयंतराव मनसाराम पाटील (अध्यक्ष ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड) हे उपस्थित होते. तसेच माननीय श्री.भाऊसो. युवराज काशिनाथ पाटील (संचालक), माननीय श्री. आबासो.विश्वासराव विनायकराव पाटील( संचालक), माननीय श्री. दादासो. राजेंद्र फकीरा पाटील (संचालक) माननीय श्री. भैय्यासो. दिनेश वासुदेव साळुंखे (संचालक) नानासो. के. व्ही. पाटील( प्रशासकीय अधिकारी) ,दादासो.महेंद्र सुरेश पाटील (उपसरपंच करणखेडा) श्री. आबासो. सुधाकर यशवंत पवार (माजी सरपंच करणखेडा) श्री. दादासो. श्यामकांत बळीराम पाटील,नानासो. लक्ष्मण जुलाल पाटील ,दादासो.सौरभ गुलाबराव भागवत, श्री. अण्णासो. मधुकर कौतिक पाटील,दादासो. गणेश शांताराम गुरव, श्री. नंदकिशोर शंकरराव पवार, श्री. दिलीप यशवंत पाटील, श्री.प्रवीण यशवंत पाटील ,श्री. राकेश बारकू पाटील तसेच गावातील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजमीन पठाण हीने केले.
तर प्रास्ताविक प्रा. डॉ. सतीश पारधी (एनएसएस कार्यक्रम अधिकारी ) यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्हि.डी. पाटील, प्रा. डॉ.नंदा कंधारे (एनएसएस महिला कार्यक्रम अधिकारी) प्रा. किशोर पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी एनएसएस स्वयंसेवकांना माननीय आबासो.
देविदास शामराव पाटील आणि दादासो. शामकांत बळीराम पाटील यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार कोमल पाटील हिने मानले.
तसेच एनएसएस स्वयंसेवकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी दादासो. गणेश शांताराम गुरव यांच्याकडून विद्यार्थ्यांना ट्रॉफी भेट देण्यात आल्या.
युथ फाॅर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटलसी, स्वच्छ भारत अभियान विशेष मोहीम, पाणी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियान ,मतदार जनजागृती अभियान, माय भारत युवा पोर्टल नोंदणी ,जागो ग्राहक जागो, अन्नपदार्थ सुरक्षा जनजागृती मोहीम ,दत्तक गावातील कार्याचा उजाळा इत्यादी नियोजित प्रकल्प पूर्ण करून राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी संस्कार शिबिर संपन्न झाले .
राष्ट्रगीताने सदर कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!