युवा कल्याण प्रतिष्ठानचा उपक्रम 100 ठिकाणी साने गुरुजी जयंती साजरी.
अमळनेर Express news
कोकणाने खानदेश ला एक शिक्षक दिला पण खानदेशने महाराष्ट्राला स्वातंत्र्यासाठी आणि समतेसाठी झुंजणारा’ साने गुरुजी’ दिला. भारतीय संस्कृती म्हणजे सर्वांगीण विकास, माणुसकी धर्म व गरिबांचे संसार सुखाचे होवो हे गुरुजींचे विचार समाजात पोहोचविण्याची गरज आहे असे प्रतिपादन युवा कल्याण प्रतिष्ठानचे वक्ते व सल्लागार मगन भाऊसाहेब यांनी केले ते नंदादीप माध्यमिक विद्यालय, निम येथे बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री अनिल चौधरी होते.
17 जून 1924 ला प्रताप हायस्कूल, अमळनेर येथे साने गुरुजी शिक्षक म्हणून रुजू झाले त्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने, युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत अमळनेर, पारोळा व धरणगाव तालुक्यात साने गुरुजी जयंतीला शंभर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते त्यात प्राथमिक, माध्यमिक शाळांचा समावेश होता. सुमारे 20000 विद्यार्थ्यांपर्यंत साने गुरुजी कर्तृत्व व विचार पोहोचविण्याचा विक्रम वक्त्यांनी केला.
साने गुरुजींच्या 125 जयंती कार्यक्रमाच्या आधी धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत हॉलमध्ये वक्त्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रा अशोक पवार सरांनी” साने गुरुजी कर्तुत्व व विचार “यावर तयार केलेले वाचन साहित्य वक्त्याना देण्यात आले. रामेश्वर भदाणे, गौतम मोरे ,डॉ. विलास पाटील, बन्सीलाल भागवत आदींनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. डी ए पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन डॉ. राहुल निकम यांनी मांन ले याप्रसंगी दीपक तिवारी अशोक बिऱ्हाडे ,रवींद्र पाटील ,अशोक पाटील ,आशा महाजन , प्रेमराज पवार, चि धू वानखेडे, अजिंक्य सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
24 डिसेंबर साने गुरुजी जयंती अभियानात, सर्व शाळांचे मुख्याध्यापक वक्त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, अमळनेर समाजकार्य कॉलेजमधील विद्यार्थी वक्ते, प्राथमिक शिक्षक ,शिक्षिका, सेवानिवृत्त शिक्षक ,माध्यमिक शिक्षक, वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक इतर अन्य मान्यवर वक्ते यांचा सहभाग होता. अत्यल्प खर्चात हा उपक्रम गेल्या तीन वर्षापासून अंमळनेर व परिसरात सुरू आहे राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवा कल्याण प्रतिष्ठान ,अमळनेर यांनी केले आहे.

