उत्कर्ष खान्देशी अधिकारी ग्रुप तर्फे मावळे बंधू चा सत्कार

0

अमळनेर  Express news

अमळनेर- येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुलचे माजी विद्यार्थी मोहित पन्नालाल मावळे व रोशन पन्नालाल मावळे या दोन्ही बंधूंनी यशाची पताका लावत शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. मोहित मावळे याची नुकतीच स्पर्धा परीक्षेद्वारे कोल्हापूर परिमंडळ मधील सातारा सिंचन मंडळात “सहाय्यक भांडारपाल”` म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी त्याची स्पर्धा परिक्षाद्वारे नगाव (ता.अमळनेर) येथे पोस्ट मास्तर म्हणून निवड झाली होती. तिथे कार्यरत असतानाच त्याची जलसंपदा विभागात “कॅनल इन्स्पेक्टर”` म्हणून निवड झाली. सध्या तो कॅनल इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. दरम्यान तो जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात कनिष्ठ लिपिक` पदासाठी मुलाखतीसाठी पात्र ठरला होता. त्याने एमपीएससी द्वारा टाईपीस्ट व क्लर्कची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली असून स्किल टेस्ट ही उत्तीर्ण केली आहे. त्या परीक्षेचा निकाल घोषित करावयाचा बाकी आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर अशक्य गोष्ट ही आपण शक्य करू शकतो. असाच मनाशी चंग बांधत त्याने पुन्हा एकदा “सहाय्यक भांडारपाल” म्हणून स्पर्धा परीक्षा द्वारे पदाची हॅट्रिक मिळवली आहे. तसेच त्याचा मोठा भाऊ रोशन मावळे याने ही नुकतेच राज्यशास्त्र या विषयात “सेट” बरोबरच “नेट” परीक्षा हे उत्तीर्ण केली आहे. त्याची विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाली आहे. त्याची ही निवड शाळेचा नावलौकिक वाढविणारी आहे. या निवडीने आर्मी स्कुलच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. निवडीबद्दल प्रा. रोशन मावळे यांचा उत्कर्ष खान्देशी अधिकारी ग्रुप तर्फे सत्कार करण्यात आला. आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त कपिल पवार, जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार, प्राथमिक शिक्षक संदीप पाटील, शिवशाही फाउंडेशन चे अध्यक्ष जयेशकुमार काटे, तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष डी ए धनगर, तालुका गणित मंडळाचे जी.पी हडपे, शिवशाही फाउंडेशन चे सचिव उमेश काटे, पालक पन्नालाल मावळे, नंदाबाई मावळे, प्राथमिक शिक्षक राजेंद्र मावळे आदी उपस्थित होते.
———
अमळनेर- प्रा. रोशन मावळे यांचा सत्कार करताना आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त कपिल पवार, संदीप पाटील व मान्यवर आदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!