ज्योतिबाची प्रखर ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले !!!

0

अमळनेर Express news

भारताला खऱ्या अर्थाने बहुजनाच्या शिक्षणासाठी झटणारे दाम्पत्य म्हणजे ज्योतिबा आणि सावित्रीबाई होते. ज्या काळात मनोवाद्यांनी बहुजनांना शिक्षणासाठी मनुस्मृतीच्या नियमानुसार बंदी केली होती त्या काळामध्ये ह्या दांपत्यांनी भारतात ज्ञानाची ज्योत पेटवली. अशा या दांपत्यातील ज्योतिबाची ज्ञानज्योत म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई फुले या शांत, निरागस, हुशार, ज्ञानग्रही ,संयमी, शील संपन्न होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. आईचे नाव लक्ष्मीबाई होते. खंडोजी नेवसे पाटील हे गावातील प्रतिष्ठित, नामवंत शेतकरी होते. त्याचप्रमाणे गावातील न्याय निवाडा करण्याचे उत्तम काम ते करीत असत. त्यांच्या प्रामाणिक स्वभाव, सत्यावर निष्ठा, परोपकाराची भावना, निर्भीडपणा, संयम, करुणामय प्रेम करणारी वृत्ती गावात सर्वांना घेऊन चालणारा स्वभाव होता. गावांमधील यात्रा, उत्सव ,सण सामोपचाराने कोणत्याही जातीच्या लोकांवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीने साजरे होत असत. सावित्रीबाई फुले या खेळामध्ये तरबेज होत्या. विटी दांडू, नेमबाजी ते अचूक करीत. आपल्या वडिलांसोबत गावामध्ये जात असत. आपल्या वडिलांच्या न्यायनिवाडा करण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करीत असत. आपल्या शेतात आई सोबत कामाला जात असत. लहानपणापासून आपल्या मैत्रिणीसोबत विविध खेळ त्या खेळत असत. आपल्या मैत्रिणी सोबत गोपाळकाला करीत असत. सावित्रीबाई फुले यांना उत्कृष्ट पाक कला येत होती. आपल्या आईला घरी त्या सर्व कामांमध्ये मदत करीत होत्या. घरातील संस्कारमय वातावरणाचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम झाला. त्या काळात महिलांना तथा बहुजनांच्या मुलांना शिक्षणाला अलिखित बंदी होती त्यामुळे बहुजनांच्या मुली ह्या केवळ चूल आणि मूल हेच कर्तव्य करीत होत्या. सावित्रीबाईंना शिक्षण घेण्याची जिद्द होती परंतु गावामध्ये बहुजनांसाठी तसेच मुलींना शिक्षणासाठी शाळा नसल्याने त्यांचे शिक्षण झाले नाही. एकदा यात्रेमध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याने सावित्रीबाईला इंग्रजी पुस्तक दिले होते. ते पुस्तक सावित्रीबाईंनी जपून ठेवले होते. त्या काळात घरातील लोक शिक्षणाने मुली बिघडतील धर्माचे नुकसान होईल अशा मनुवादी विचाराचा पगडा असलेले होते. सावित्रीबाईला तीन भाऊ होते. सावित्रीबाई घरातील लाडकी मुलगी होती. सावित्रीबाईंचा विवाह इंग्रजी शिक्षण घेतलेले ज्योतिबा गोविंदराव फुले यांच्याशी नऊ वर्षाचे असताना झाला. त्या काळात मुलीला असतांनाच त्यांचा विवाह केला जात असे. मुलाचे वय सुद्धा कमी असायचे. ज्योतिबा तेरा वर्षाचे व सावित्रीबाई नऊ वर्षाच्या असताना त्यांचा विवाह झाला. तात्यासाहेब ज्योतीराव फुले यांची परिस्थिती चांगली होती. सावित्रीबाई चे माहेर सुद्धा बऱ्यापैकी श्रीमंत होते. तात्यासाहेब ज्योतीराव फुले हे इंग्रजी शाळेत शिकलेले होते. त्यांना इंग्रजी चांगल्यापैकी येत होती. ख्रिश्चन समाजाचे लीजीट साहेब व मुस्लिम समाजाचे मुनशी बेग यांच्या मदतीने शिक्षण घेतले. विविध संस्कृतीशी त्यांच्या संबंध आला. जेव्हा समाजाशी संबंध आला त्यावेळी एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून त्यांना बाहेर काढून टाकल्यामुळे त्यांनी समाजात चालणाऱ्या विविध गोष्टींचा अभ्यास केला. भारतातील चालत असलेल्या विषमतावादी परंपरेचा अचूक अभ्यास केला. भारतातील विविध ग्रंथाचा अभ्यास करून जातीय वर्चस्वाचे मूळ शोधुन काढले. त्यामुळे त्यांनी मनुस्मृतीच्या नियमानुसार सर्वच समाजातील महिलांवर अन्याय होत होता.अशा अन्यायाविरुद्ध प्रबोधन करण्याचे ठरविले. माई सावित्रीबाई त्यांच्या जीवनात आल्यावर त्यांना खूप मदत झाली. सावित्रीबाईंना आपला धनी करीत असलेल्या सामाजिक कार्याची जाणीव झाली. सावित्रीबाईंनी शेतामध्ये काम करीत असताना निवांत च्या वेळी तात्यासाहेब ज्योतिबा फुले यांच्याकडून मराठीचे ज्ञान शिकून घेतले. प्राथमिक स्वरूपाचे ज्ञान झाल्यानंतर सावित्रीबाईंनी तात्या साहेबांनी ‌ दिलेली सर्व पुस्तके वाचली. सावित्रीबाई शिकल्या त्यानंतर त्यांना शिक्षिकेच्या प्रशिक्षणासाठी फेरारे नावाच्या विदेशी मॅडमांकडे नगरला पाठवले. तिथून शिक्षिकेच्या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. काकासाहेब ज्योतीराव फुले यांनी सुरू केलेल्या १८४८ च्या शाळेच्या पहिल्या शिक्षकांना सावित्रीबाई बनल्या. त्या काळात तात्या साहेबांनी चालवलेला ज्ञानयज्ञ याला शाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षक शिक्षिका मिळत नव्हते परंतु तात्यासाहेब डगमगले नाही त्यांनी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाईला शिकविले व शाळेचे शिक्षिका व मुख्याध्यापिका बनविले.
सावित्रीबाईंची दिनचर्या चालू झाली. सुरुवातीला सहा मुली त्यानंतर आठ मुली अशा पद्धतीची पहिली शाळा सुरू झाली. तात्यासाहेब जातीवादी नव्हते ते जर जातीवादी असते तर त्यांच्या पहिल्या शाळेत ब्राह्मणांच्या मुली शिकल्या नसत्या. सावित्रीबाईंनी अध्यापनाचे कार्यकरीत असताना अनेक अडचणींचा सामना केला. भट , ब्राह्मणांनी त्यांना शाळेत जाताना अडविण्याचा प्रयत्न केला. सावित्रीबाई आडविणाऱ्या व्यक्तीच्या थोबाडीत अन्याय विरुद्ध लढा दिला. शाळेत शिकवत असताना अंगावर शेणाचे गोळे झेलले. त्यासाठी सावित्रीबाई आमच्या मुलींसाठी ओल्या झाल्या. एका लुगड्यावर ओल्या होऊन शाळा चालवली. ज्योतिबाला सावित्री तापाने फणफणत असताना त्यांनी विचारले तुला वेळोवेळी ताप येण्याचे कारण काय असेल? त्यावेळी सावित्रीबाईंनी दररोज मनूवाद्यांकडून होणाऱ्या शेण गोळ्यांच्या त्रासामुळे थंड पाण्याने आंघोळ करावी लागते त्यामुळे मला ताप येतो. सावित्रीबाई अति त्रास झाल्यावर तात्या साहेबांकडे लुगड्याची मागणी केली. दररोज शाळेत जाण्याचे कधीही थांबवले नाही. प्रत्येक वेळी भट, ब्राह्मण शाळेमध्ये लपून आवाज करायचे. लोकांना भडकवून शिक्षणात खंड पाडण्याचा प्रयत्न करायचे. परंतु सावित्रीबाई कर्मठांना घाबरली नाही. अध्यापनाचा वसा सावित्रीबाईंनी सोडला नाही. पुण्याच्या परिसरात एकूण १८ शाळा खोलून बहुजनांना शिक्षण दिले. सावित्रीबाई नसती तर बहुजनांच्या मुलींना शिक्षण मिळाले नसते. मांग समाजाचे ‌ पैलवान लहुजी साळवे यांच्या नातीला शिक्षण देऊन मांग समाजातून प्रतिभासंपन्न मुक्ता साळवे तयार झाली. मुक्ता साळवे ने पत्र लिहून आपला विद्रोह मांडला. माननीय लहुजी साळवे यांनी तात्यासाहेब ज्योतिराव व सावित्रीबाई यांच्या कार्याला सतत मदत केली. तात्यासाहेब ज्योतीराव फुले हे स्वतः लहुजी साळवे यांचे शिष्य होते. लहुजी वस्ताद यांचा पुण्यात दरारा होता. तात्यासाहेब ज्योतीराम फुले यांना लहुजी साळवे यांनी सर्व प्रकारचे कसरतीची शिक्षण दिलेले होते. तात्यासाहेब उत्तम मल्ल होते. तलवार, दांडपट्टा, भाला, काठी फिरविण्यात तरबेज होते. तात्या साहेबांनी महिलांच्या शिक्षणानंतर आपला मोर्चा समाजातील कर्मठ रूढी, परंपरा यांच्याकडे वळविला. धर्मामध्ये चालू असलेला गोंधळ थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाची धुरा सावित्रीबाईंनी पुढे चालू ठेवली. समाजाला प्रबोधनात्मक विचार दिले. सावित्रीबाई तात्यासाहेब ज्योतीराम फुले यांची ढाल होती. ब्राह्मण समाजातील महिलांना विधवा झाल्यावर घरामध्ये भगवे अथवा पांढरे वस्त्र घालून राहावे लागेल. त्यांना बाहेर जाण्यास लग्न समारंभ व इतर कार्यक्रमात जाण्यास बंदी होती. तात्यासाहेब व सावित्रीबाई यांच्या पुढाकाराने विधवा विवाह लावण्यास सुरुवात झाली. सावित्रीबाई घरोघरी जाऊन महिलांमध्ये जागृती निर्माण केली. सावित्रीबाईंनी विधवा असलेल्या काशीबाई नावाच्या ब्राह्मण महिलेला घरातून तिच्यावर अत्याचार होऊन तिला गर्भधारणा झालेली होती. समाजाने तिला वाळीत टाकले होते. सावित्रीबाईंनी काशीबाई स्वतःचा जीव द्यायला जात होती. तिला घरी आणून तिचा सांभाळ केला. तिला झालेल्या अपत्याला स्वतः सांभाळले. त्या आपत्याला स्वतः दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत होते. महिलांवरील अन्याय थांबवण्यासाठी महिला सुरक्षागृह स्थापन केले. महिलांना सांभाळून त्यांच्यासाठी अन्नाची सोय सावित्रीबाईंनी स्वतः केली. विधवांना केस कर्तन करून घरात राहावे लागेल. या विरुध्द नव्यांचा संप घडून आणला. महिलांना स्वाभिमानाची वागणूक मिळाली. मुर्ती पूजेच्या नावावर चाललेली पुरोहितांची लूट समाजाला जागृत करून सावित्रीबाई व ज्योतिबा यांनी थांबविली. समाजात होत असलेले बालविवाह याबाबत सावित्रीबाईंनी मुलींना प्रेमाने समजावत समाजामध्ये स्वाभिमानाची ज्योत पेटवली. दत्तक घेतलेल्या यशवंतला चांगले शिक्षण घेऊन समाजाच्या कामासाठी झटणारा डॉक्टर बनवले. समाजामध्ये चालत असलेल्या ‌ अनिष्ट रूढी यावर सत्यशोधक विचारा मार्फत जनजागृती केली. सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले हा कवितासंग्रह लिहिला. अज्ञान, अनिष्ट रूढी, तात्या साहेबांची योगदान, निसर्ग, इंग्रज राजवट याबाबत कविता लिहिल्या. बावनकशी सुबोध रत्नाकर नावाचा काव्यसंग्रह लिहिला. समाजाला जागृत करण्यासाठी विविध भाषणे दिली. शिक्षणाची ज्ञानगंगा भागात आणण्याचे श्रेय तात्यासाहेब ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांना जाते. सावित्रीबाई आपल्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ दिला नाही संपूर्ण आयुष्य समाजाच्या कामासाठी वाहून घेतले. तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांना अर्धांग वायू चा झटका आल्यावर त्यांची सेवा करीत समाजकार्य चालू ठेवले. तात्या साहेबांच्या अंत्ययात्रेच्या वेळी भाऊबदांमधून कुणीही तिटवे घ्यायला तयार नव्हते त्यावेळी प्रत्यक्ष सावित्रीबाई फुले यांनी घेऊन अंतयात्रा पार पाडली. अत्यंत स्वाभिमानी असलेले फुले कुटुंब आदर्श कुटुंब होय. या कुटुंबाला समाजाला नवा विचार दिला. भारतामध्ये प्रबोधनाच्या चळवळीत ‌ तात्यासाहेब ज्योतीराम फुले व सावित्रीबाई फुले यांनी जीवन समर्पित केलेले होते. भारतात शिक्षणाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल फुले दाबून कुटुंबाचा सत्कार इंग्रज अधिकाऱ्यांनी केला. तात्यासाहेब ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रबोधनात्मक चळवळीमुळे समाजामध्ये चिकित्सा करण्याची वृत्ती वाढली. शिक्षणामुळे समाजाला दिशा मिळाली. सावित्रीबाई आपल्या धनी ने आरंभीलेला ज्ञानयज्ञ, कर्मयज्ञ कोणतीही अपेक्षा न ठेवता चालू ठेवला. आपला मुलगा यशवंत याच्यासाठी सुशिक्षित कुटुंबातील मुलगी राधा व यशवंत यांचा पहिला पुरोहित मुक्त विवाह लावला. आपल्या सुनेला मातृसत्ताक पद्धतीने वागणूक देणारी सावित्रीबाई आधुनिक युगातील महिला होती. आज महिला शिक्षित झाल्या परंतु सुशिक्षित झाल्या असं म्हणायला मन धजावत नाही. महिलेला महिलेकडूनच मिळणारी अत्यंत वाईट वागणूक ‌ ही वाईट गोष्ट आहे. आमच्या दूरदर्शन व इतर वाहिन्यांवर चालू असलेल्या मालिका सतत कर्मकांडाच्या समर्थन करणाऱ्या आहेत. प्रत्येक मालिकेतून समाजाला नवीन असा कोणताच बोध होत नाही. तरीही आमचा समाज अशा गोष्टींना विरोध करीत नाही ही मोठी शोकांतिका आहे. बुवाबाजींच्या समर्थन करणाऱ्या अनेक मालिका टीव्हीवर दाखविल्या जातात. आज तात्यासाहेब ज्योतिबा फुले व सावित्रीबाई असत्या तर त्यांनी आपण निर्माण केलेला सत्यशोधक समाज असा होता का असा सवाल केला असता? सावित्रीबाई फुले यांनी तात्यासाहेब ज्योतीराव फुले यांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण सत्यशोधक चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन मरेपर्यंत विवेकी विचार समाजाला देत राहिले. आज महिला सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्या या प्रगतीला सावित्रीबाई सारख्या महिला होत्या म्हणून विकास करू शकल्या. आज समाजात मुलांच्या, परिवाराच्या प्रगतीसाठी नारायण नागबली, गृहशांती, वास्तुशांती, पितृदोष निवारण, तसेच विविध विधी केले जातात. हे विधी शिक्षित झालेला समाज करीत असतो. न शिकलेला समाज या कर्मकांडांकडे पैशाच्या अभावी जाऊ शकत नाही परंतु तात्यासाहेब ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी घडविलेला समाज कर्मकांडांकडे वळतो ही समाजाची शोकांतिका आहे. कुणीही भोंदू महाराज कथा सांगण्याच्या नावाने महाराष्ट्रात येतो. तो लोकांना मोह, माया यापासून अलिप्त रहावे असे सांगतो. स्वतः महत्व आलिशान विमानातून, सर्वात महाग असलेल्या गाड्यांमधून येतो. महाराजाने स्वतः मोह , माया सोडली नाही आणि तो लोकांना मोह, माया सोडायला सांगतो. हा कर्मठ महाराज लोकांना भविष्य सांगतो परंतु स्वतः मात्र अनेक बलदंड लोकांना आपल्या सुरक्षेसाठी ठेवतो. महाराजाला जर सर्व समजते तर त्याला आपण कधी मरू याचे ज्ञान का नाही? हे मुळीच समजत नाही. काही महाराज वनस्पतीला आलेले रुद्राक्ष विकून मूर्ख बनवतो. सावित्रीबाई फुले यांनी भारतामध्ये प्लेग नावाचा आजार आल्यावर गरीब ,वंचित, निर्धन लोकांना दवाखान्यात मोफत उपचार करून सहकार्य केले. स्वतः गरिबांच्या मुलांना खांद्यावर घेऊन त्यांचा जीव वाचविला. अशाच प्रयत्नात सावित्रीबाईंना प्लेगच्या साथीत दगावल्या अशा या महान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!