सावित्रीमाईचे जीवन चरित्र नाट्यछटेतून सुंदर सादरीकरण*….

0

अमळनेर Express news

*क्रांतीसुर्य ज्योतिबा व सावित्रीमाई फुले यांच्या कर्तृत्वामुळे आजची महिला स्वाभिमानाने जगत आहे* : ए वाय शिंगणे.

धरणगांव प्रतिनिधी –

साळवे इंग्रजी विद्यालय, व साने गुरूजी प्राथमिक विद्यालय, तालुका धरणगाव येथे ३ जानेवारी सावित्रीमाई फुले यांचा जन्मोत्सवा निमित्ताने ‘महिला शिक्षण दिन ‘, ‘महिला मुक्ती दिन ‘ व ‘बालिका दिन ‘ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतातील थोर समाज सुधारक, देशातील पहिल्या मुख्याध्यापिका, शिक्षिका, कवयित्री, सत्यशोधिका सावित्रीमाई फुले यांचे कार्य समस्त महिलांसाठी प्रेरणादायी असून आज महिला सन्मानाने जगत आहेत. त्या केवळ ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्यामुळेच !. असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षक ए वाय शिंगणे यांनी केले. विद्यालयतील सर्व मुलींनी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्यामाई होळकर, सावित्रीमाई फुले, फातिमाबी शेख व त्यागमूर्ती माता रमाई या सर्व महामातांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण करावे. असे प्रतिपादन जी व्ही नारखेडे यांनी केले.
विद्यालयातील नाट्यप्रेमी विद्यार्थ्यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रावर सुंदर अशी नाट्यछटा सादर केली, या नाट्यछटेला व्ही के मोरे, सौ रंजना नेहेते, व सौ प्रतिभा पाटील यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी महान थोर समाज सुधारक व्यक्तींच्या आदर्श घ्यावा जीवनात त्यांनी केलेला संघर्षाचा धडा यावा आणि प्रगती करावी. असे आवाहन मुख्याध्यापक एस डी मोरे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक भाषणे केली. उत्कृष्ट भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली व सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!