पी बी ए इंग्लिश मीडियम विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संपन्न.
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनीधी
अमळनेर. बीबीए इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथमतः विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय जे एस देवरे तसेच प्रमुख वक्ते आदरणीय डीए पाटील सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्या अर्पण करून दिपप्रज्वलन केले. व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले .विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर मनोगते व्यक्त केली . त्यानंतर शाळेच्या शिक्षिका सुवर्णा बोहरे यांनी क्रांतीज्योती यांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले . तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय डीए पाटील सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. बहुजनांना शिक्षणाच्या प्रवाहात ज्या महापुरुषांनी आणले ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले. आमच्या मुलांना आमचे प्रेरणास्थान कोण आहेत कोण असावेत यावर दयाराम पाटील यांनी आपले मत प्रकट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय जे एस देवरे यांनी आपल्या अध्यक्षही भाषणात एक समाजसेविका या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका शिक्षणाची ज्योत पेटवून समस्त महिला मुक्तीच्या दायिनी सावित्रीबाई फुले यांच्यावर प्रकाश टाकला.
सदर कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यालयाचे आदरणीय चेअरमन श्री प्रदीप जी के अग्रवाल आदरणीय मुख्याध्यापक जे एस देवरे पर्यवेक्षक महेश माळी पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही पी बडवे प्रशांतजी वंजारी रोहन मुंदडा अशोक महाजन तसेच शिक्षक रुंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे अनमोल सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या शेवटी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्न विचारण्यात आले व ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिले त्यांना बक्षीस देण्यात आले व अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक प्रशांत वंजारी यांनी केले


