3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दरवर्षी महिला मंच ट्रस्ट अंमळनेर यांच्यातर्फे विविध स्पर्धेचे आयोजन
अमळनेर Express news 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दरवर्षी महिला मंच ट्रस्ट अंमळनेर यांच्यातर्फे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या वर्षी सुद्धा महिलासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात सोलो (एकल) व कपल (जोडीने) डान्स स्पर्धेत अनेक उत्कृष्ट कलावंत सहभागी झाल्या होत्या भगिनी मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगलाताई सोनवणे व श्रीमती मनीषा गवते मॅडम यांनी आपले उत्कृष्ट एकल नृत्य सादर करीत आपल्या अदाकारीने रसिकांना मंत्रमुग्ध करून सोनवणे मॅडम यांनी द्वितीय क्रमांकाचे तर गवते मॅडम यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले तसेच कपल डान्स मध्ये याच जोडीने द्वितीय क्रमांक पटकावला या विषयाबद्दल त्यांचे भगिनी मंडळ संस्था अध्यक्ष सौ सरोज ताई भांडारकर व कार्यकारणी पदाधिकारी यांनी कौतुक केले

