स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा
अमळनेर Express news
अमळनेर, 26 जानेवारी – स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मार्गदर्शक श्री बजरंग शेठजी अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी ‘ध्वजगीत’ गायन करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
कार्यक्रमाच्या पुढील भागात, विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आणि टेक्नोवेदआर्ट मेला मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शाळेच्यावतीने पारितोषिक देण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन आणि नृत्य सादर करून उपस्थित पालक व विद्यार्थ्यांचे मन जिंकले.
या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शाळेने रिटायर मिलिटरी सैनिकांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. त्यांचे योगदान आणि देशसेवेबद्दल विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. कार्यक्रमात शाळेचे चेअरमन श्री. डी.डी. पाटील सर, संस्थापक अध्यक्ष श्री. नीरज अग्रवाल सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनोद अमृतकर सर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनोद अमृतकर सर यांनी सहकार्यांना मार्गदर्शन केले आणि कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला.

