मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा (टप्पा 2) उपक्रमात सारजाई दामोदर कुडे विद्यालयाचा जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळाल्याने जिल्हा परिषदेकडून कडून गौरव*

0

अमळनेर Express news

अंमळनेर प्रतिनीधी
—————————————————————-
धरणगाव– येथील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालय व बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा या दोघ विभागातून
सन 2024-25 यावर्षीच्या महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या *माझी शाळा सुंदर शाळा* (टप्पा 2) या उपक्रमात शासनाने लावलेल्या निकषात परिपूर्णता आढळल्याने *सारजाई दामोदर कुडे** या माध्यमिक विभागाला तालुक्यातून प्रथम व जिल्ह्यातुन दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले होते. पात्रतेच्या निकषांमध्ये तीन क्षेत्र देण्यात आले होते त्यात पायाभूत सुविधा ,शासन ध्येय धोरण व अंमलबजावणी,शैक्षणिक संपादणूक याचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास शारीरिक विकास सोबतच विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण व सुरक्षित वातावरण प्रदान करणे, विद्यार्थ्यांचे हजेरी प्रमाण विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, पालक संघ,माता पालक संघ, सखी सावित्री समिती या माध्यमातून समाजाचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन शाळेचा व समाजाचा विकास साधने हा या उपक्रमा मागचा हेतू होता. त्या बक्षिसाचे वितरण नुकतेच नियोजन भवन जळगाव या ठिकाणी अतिशय भव्य समारंभात महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.संजय सावकारे,मा.ना.किशोर आप्पा पाटील, माजी महापौर सीमा भोळे,जिल्हा परिषदेच्या सिईओ मीनल करणवाल मॅडम,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, शिक्षणाधिकारी(माध्य.) कल्पना चव्हाण मॅडम, शिक्षणाधिकारी (प्राथ.) विकास पाटील मुख्या.महामंडळ अध्यक्ष जे.के.अाण्णापाटील यांच्या प्रमुख उपस्थित बक्षिसाचे वितरण करण्यात आले .सन्मान चिन्ह व 5 लाख रु चा चेक सर्टीफिकेट असे बक्षिसाचे स्वरूप आहे.स्वीकारतांना संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय हेमलालशेठजी भाटिया, संस्थेचे सचिव ललितजी उपासनी,संस्थेचे उपाध्यक्ष चिंतामण पाटील तसेच संस्थेचे मार्गदर्शक प्रा रमेश महाजन ,धरणगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मा. डॉ.भावना भोसले मॅडम त्याचप्रमाणे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस एस पाटील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील उपस्थित होते. यासोबत व्यासपीठावर शाळेतील ज्येष्ठ शिक्षक किशोर चौधरी, महेश आहेराव ,ज्येष्ठ कर्मचारी शिरीष बयस,नारायण वाणी, महेश आहेराव, ए एच पाटील ,वाय पी पाटील, ए डी पाटील,किरण पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.या यशामागे खास करून प्रेरणा मिळाली ती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ श्री अंकित साहेब,यासाठी अनमोल मार्गदर्शन लाभले ते शिक्षणाधिकारी (प्राथ.) विकास पाटील तसेच गटविकास अधिकारी मा श्री सुशांत पाटील,धरणगाव नगर परिषदेचे जनार्दन पवार,डॉ भावना भोसले मॅडम,केंद्रप्रमुख भिकन शिरसाठ यांचे सर्वांचे संस्थेचे पदाधिकारी व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.तसेच संस्थेने शाळेतील दोघ विभागाचे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही अभिनंदन करून भविष्यासाठी प्रेरणादायी शुभेच्छा दिल्यात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!