किसान माध्यमिक विद्यालयात शालेय आरोग्य प्रोत्सहन कार्यक्रम (SCHOOL HEALTH PROGRAMME) भारत सरकारच्या आयुष्यमान भारत उपक्रमांतर्गत करण्यात आले*
अमळनेर Express news
अंमळनेर प्रतिनीधी
*ज जि वि प्र मराठा विद्याप्रसारक मंडळ संचलित” किसान माध्यमिक विद्यालय, शेवगे बु येथे आज दि 1-4-2025 SHP अंतर्गत School Health Programme अंतर्गत कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय जाधवसर हे होते. सर्व मुलींना आरोग्यदायी किट देण्यात आले यावेळी डॉ तुषार पाटील यांनी किशोर वयीन मुलींच्या समस्या व आरोग्य यावर मार्गदर्शन केले, व श्रीमती मोहिनी चव्हाण मॅडम व प्रमिला ईशी मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक समस्यांवर तसेच रोगप्रतिबंधक उपाययोजना, आरोग्य शिक्षण व पोषणाविषयी जागरूकता निर्माण करणे व समुपदेशन केले.*
*श्री. अशोक पाटील सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच श्री. दीपक जाधव सर यांनी सर्वांचे आभार मानले, यावेळी विद्यार्थी व त्यांचे पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शापोआ मदतनीस उपस्थित होते*.

