महात्मा फुले हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेबांना अभिवादन !
अमळनेर Express news
अंमळनेर प्रतिनिधी –
धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतातील थोर समाज सुधारक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव, सत्यशोधक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सवनिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षीका एम के कापडणे यांच्या हस्ते सत्यशोधक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक जे एस पवार, एम बी मोरे, एस व्ही आढावे, एच डी माळी, एस एन कोळी, पी डी पाटील,व्ही टी माळी, लिपिक जे एस महाजन, पी डी बडगुजर, ग्रंथपाल गोपाल महाजन,जीवन भोई, अशोक पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

