साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन व माल्यार्पण ग्रामपंचायत सदस्य प्रकाश भिका वाल्हे याच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास वाचनालय अध्यक्ष डी.एम पाटील सर, ग्रा.प. सदस्य सरपंच पती वकील बाबा, उपसरपंच गोपाल पाटील, सदस्य श्रीकांत गबाजी पाटील, राजेंद्र फुला पाटील, नवल आनंदा पाटील, सुनिल गंगाराम पाटील, युवराज नथू पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथपाल विजय पाटील यांनी प्रयत्न केले. 💐💐🙏🙏

