किसान माध्यमिक विद्यालय शेवगे बु. येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी

0

अमळनेर Express news

अंमळनेर प्रतिनीधी

*आज दि 14-4-2025, रोजी किसान माध्यमिक विद्यालय शेवगे बु. येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्ताने ज जि वि प्र मराठा विद्याप्रसारक संस्था संचलित “किसान माध्यमिक विद्यालय, शेवगे बु., येथे    महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या  प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती भिकूताई देशमुख (सरपंच, शेवगे बु ग्रामपंचायत) यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी गावातील सन्माननीय नागरिक, ज्येष्ठ नागरिक व मुख्याध्यापक श्री संजय जाधव सर यांनी यांनीही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला बाबासाहेब न्याय समता बंधुभाव मूल्यांची रुजवण प्रति विद्यार्थ्यांना अवगत केले त्याच्या कार्याची ओळख करून दिली सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे मानद सचिव श्री निलेशदादा भोईटे यांनी सर्वांना डॉ बाबा साहेब आंबेडकर जयंतीच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या, विद्यार्थी व विद्यार्थीनीनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन श्री दीपक जाधव सर यांनी केले आभार प्रदर्शन श्री अशोक पाटील यांनी केले यावेळी पालक,माता पालक, शालेय पोषक आहार मदतनीस,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते*..!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!