महामानव, दलितांचे कैवारी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये अभिवादन करून संपन्न !
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
महामानव थोर विधीतज्ञ, भारतीय लोकशाही घटनेचेजनक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पीबीए इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये अभिवादन करून उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक जे .एस .देवरे यांच्या शुभहस्ते प्रतिमे समोर दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली. शाळेच्या उपशिक्षिका पूनम महाजन यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य ,त्याग पूर्ण आत्म समर्पित केलेले दलितांप्रति निस्सिम प्रभावी कार्य, त्यांचे वर्णन सुंदर अमोघवाणीत मनोगत स्वरूपात व्यक्त केले. त्यानंतर माननीय मुख्याध्यापक देवरे सर यांनी त्यांच्या जीवनातील ज्ञात अज्ञात पण प्रचंड प्रभावित कार्याचे विवेचन अलंकारिक भाषेत व्यक्त केले .
सदर कार्यक्रमासाठी अनमोल मार्गदर्शन व सहकार्य शाळेचे चेअरमन श्री प्रदीप जी अग्रवाल मुख्याध्यापक जे एस देवरे पर्यवेक्षक महेश माळी पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही पी बडवे, प्रशांत वंजारी, श्रावण पाटील, व्ही जी बोरोले, व्ही.एस .अमृतकर व सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे लाभले.

