पिंपळे आश्रम शाळा विद्यालयात डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

0

 

अमळनेर एक्सप्रेस न्युज
अमळनेर प्रतिनिधी.

पिंपळे आश्रम शाळा विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री उदय पाटील. तसेच प्राथमिक विभागाचे अविनाश अहिरे सर, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय पाटील सर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले .कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते पाटील डी ए पाटील सरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यालयातील इयत्ता आठवीचे विद्यार्थी विक्रम रोहिदास पावरा  ;सोनू सुनील पावरा; रोशन सुरेश पावरा, समीर किरसिंग तिरसे ,चेतन बन्सीलाल पावरा या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख होते डीए पाटील सर यांनी भारतीय संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर प्रकाश टाकला. संविधान पूर्वस्थिती व संविधान निर्मितीनंतरची स्थिती यावर प्रकाश टाकला. व संविधानाने आम्हाला स्वातंत्र्य समता न्याय हक्क व अधिकार व प्रौढ मतदानाचा अधिकार संविधानाने आम्हाला दिला. त्यामुळे राजाची निवड ही आता आम्ही मतपेटीतून करतो. असे आपले मत प्रकट केले. म्हणून आमच्या महापुरुषांनी आमच्यासाठी घेतलेले कष्ट याची आठवण करून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय उदय पाटील यांनी महापुरुषांच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकला. व विद्यार्थ्यांची संवाद साधत आपले अध्यक्षीय भाषण केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अविनाश अहिरे ,शिक्षक प्रवीण पाटील, सतीश कागणे ,भटू वानखेडे, गंगासागर वानखेडे ,बाळासाहेब बोरसे, योगेश भामरे, स्वप्निल पाटील ,श्रीमती माधुरी पाटील ,स्वप्निल एच पाटील ,श्री सचिन पाटील ,श्री रवींद्र धनगर, श्री प्रतीक पाटील ,अंबालाल पाटील, विनोद महाले, दीपक नांद्रे, उदय पाटील, भाऊसाहेब श्री चेतन पाटील ,सीमा चौधरी, श्री मुकेश पवार ,आशिष निकम ,रवींद्र नेरकर ,संजू पवार ,श्री हितेश पवार, आशिष निकम ,रवींद्र नेरकर ,अविनाश पाटील, चेतन भाऊसाहेब ,श्रीमती विद्या पाटील ,या सर्वांनी परिश्रम घेतले ,सूत्रसंचालन रवींद्र नेरकर यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!