अमळनेर फ्रुट सेल सोसायटीच्या संचालकपदी उमेश काटे बिनविरोध
अमळनेर Express news
अंमळनेर प्रतिनीधी
अमळनेर- तालुक्यातील सहकार क्षेत्रात नामांकित असलेली एक संस्था म्हणजे अमळनेर तालुका को-ऑपरेटिव्ह फ्रुट सेल सोसायटी. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही संस्था कार्यरत आहे. अशा या नामांकित
अमळनेर तालुका को-ऑपरेटिव्ह फ्रुट सेल सोसायटीच्या संचालक पदी उमेश प्रतापराव काटे यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अमळनेर तालुका को-ऑपरेटिव्ह फ्रुट सेल सोसायटीची संस्थेच्या कार्यालयात गुरुवारी संचालक मंडळाची विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षपदी संस्थेचे चेअरमन प्रताप पाटील हे होते. या बैठकीत स्वीकृत संचालक पदी उमेश प्रतापराव काटे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चाही करण्यात आली. या विशेष बैठकीला चेअरमन प्रताप आत्माराम पाटील, व्हाईस चेअरमन भिका हिरामण धनगर, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब आधार पाटील, युवराज आत्माराम पाटील, भागवत पंडित पाटील, शामकांत बळीराम पाटील, अनिल भीमराव पाटील, कुलदीप कृष्णा पाटील, मंगलाबाई शिवाजी पाटील, सुवर्णा अनिल पाटील, सुशीलकुमार सुधाकर पाटील, हिलाल छन्नू सैंदाणे, सुनील कन्हैयालाल काटे, संदीप लोटन चौधरी, शिवाजीराव पाटील, अनिल अहिरराव, शिवशाही फाउंडेशन चे अध्यक्ष जयेशकुमार काटे, मॅनेजर लहू पाटील, जिग्नेश पाटील, नामदेव पाटील आदि उपस्थित होते. यावेळी चेअरमन प्रताप पाटील, संचालक भागवत पाटील यांनी मनोगत व्यक्त करत श्री काटे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शामकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नवनिर्वाचित संचालक उमेश काटे यांनी सांगितले की, शेतकरी हितासाठी कार्यरत असणारी फ्रुट सेल सोसायटी त यापूर्वी आमचे मोठे काका स्वर्गीय पुरुषोत्तम काटे व वडील स्वर्गीय प्रतापराव काटे यांनी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ही संस्था भरभराटीस कशी येईल यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. दरम्यान माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी श्री काटे यांचा सत्कार केला. यावेळी चेअरमन प्रताप पाटील व जयेशकुमार काटे यांच्या सह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
——–
अमळनेर – तालुका फ्रुट सेल सोसायटीत उमेश काटे यांची संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना चेअरमन प्रताप पाटील व पदाधिकारी
—-
अमळनेर – तालुका फ्रुट सेल सोसायटीत उमेश काटे यांची संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील. शेजारी चेअरमन प्रताप पाटील, जयेशकुमार काटे व पदाधिकारी


