अँड ललिता ताई पाटील इंटरनॅशनल स्कूल सीबीएससी विद्यालयात सामाजिक न्याय दिवस साजरा.

0

 

अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी

युवा कल्याण प्रतिष्ठान राष्ट्रीय विचार प्रबोधन अंतर्गत प्राध्यापक अशोक पवार सर यांनी चालविलेल्या  महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार  अंतर्गत अँड ललिता ताई पाटील इंटरनॅशनल स्कूल सीबीएससी विद्यालयात सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज चव्हाण सर विराजमान होते .सामाजिक न्यायी, शिक्षक, कृषी ,केला, क्रिडा, महिला लोककल्याणासाठी महत्त्वपूर्ण कायदे अशा अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रात आपल्या दूरदृष्टीने अनेक योजना व अंमलबजावणीने लोकांसाठी कसे राबवावीत याचे ज्वलंत जिवंत जातिवंत उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू महाराज .छत्रपती शिवाजीमहाराजांचे रयतेचे राज्याचे, महात्मा फुले यांनी सुरू केलेला ज्ञानयज्ञ पुढे नेऊन त्यावर अंमलबजावणी करणारा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज . .आरक्षणाचे जनक सतत गोरगरिबांच्या वाड्या वस्त्यांवर जाऊन त्यांच्या समस्या अडचणी दूर करणारा लोक राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज असे प्रतिपादन प्रमुख वक्ते डी. ए. पाटील. सर यांनी केले .कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक दत्तात्रय दोशी, केदार देशमुख, रवींद्र ठाकरे, अतुल भदाणे, रमेश धनगर, ममता  पाटील, नयना पाटील ,यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!