डॉक्टरांचा सन्मान – स्वामी विवेकानंदांच्या विद्यार्थ्यांकडून सदिच्छा भेट.
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर 1 जुलै. आज एक जुलै 2025 रोजी डॉक्टर दिवस असल्यामुळे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल शाळेतील सीनियर केजीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शहरातील नामांकित डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन त्यांना सदिच्छा भेट देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. समाजाला 24 तास मदत करणारे समाजाची सेवा करणारे डॉक्टरांचे समाजाने आभार मानावे त्यांची ऋण न फेडता येण्यासारखे आहे ही भावना व्यक्त करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी शहरातील नर्मदा फाउंडेशन येथे भेट देऊन डॉक्टर श्री संदीप जोशी यांना भेट दिली सरांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व विद्यार्थ्यांना दवाखान्यात काम कसे चालते याचे मार्गदर्शन केले तसेच काही विद्यार्थ्यांनी डॉक्टर श्री शरद व बाविस्कर यांच्या दवाखान्याला देखील भेट देऊन डॉक्टरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले चिमुकल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर साहेबांनी देखील खूप छान मार्गदर्शन केले व त्यांचे देखील तोंड भरून कौतुक केले. शहरात असे उपक्रम नियमित प्रमाणे घ्यावे की ज्यामुळे लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांना दवाखान्यात डॉक्टर यांचे कार्य कसे चालते याबद्दल माहिती व्हावी असे डॉक्टरांनी शिक्षकांना सुचवले.विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका सौ चित्रा चव्हाण मॅडम यांनी मार्गदर्शन केले व त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी शिक्षिका हिमांशी पाटील देखील उपस्थित होत्या.


