आज गुरुवार ३ जुलै २०२५ रोजी ढेकु रोड ( प्र. जि. मा. – ५१ ) या मुख्य रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण काम सुरु करणेबाबत समस्त ढेकू रोड वासीयांच्या वतीने अमळनेर उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सो राऊत यांना अमळनेर नगरपरिषदेचे मा.आरोग्य सभापती श्याम पाटील यांच्यासह काही ज्येष्ठ नागरिकांनी x- ray , ऑटो गॅरेजची बिले व स्मरणपत्र देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी

या पूर्वी १५ मे २०२५ रोजी देखील श्याम पाटील यांच्यासह काही नागरिकांनी प्रत्यक्ष भेट घेत विनंतीपूर्वक निवेदन देऊन कार्यकारी अभियंता यांना ढेकू रोडच्या समस्ये बाबत लक्षात आणुन दिले होते कि मागील काही महिन्यापासून ढेकू रोड ( प्र. जि. मा. – ५१ ) या मुख्य रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपात सोडून दिल्यामुळे ढेकू रोड व पिंपळे रोड वरील रहिवास्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून या रस्त्यावरून वापरणाऱ्या ज्येष्ठांपासुन सर्व वर्गातील नागरिकांना पाठीचे व मणक्यांच्या आजाराचे त्रास वाढले असुन वाहनांच्या खराब होण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्याची अवस्था खराब असल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे या सर्व गोष्टींमुळे ढेकु रोड वासियांचा जीवितास देखील धोका वाढला आहे

यावेळी विजय चव्हाण , संजय पाटील , हिम्मत पाटील , बापू वानखेडे , अक्षय चव्हाण , अनिरुद्ध शिसोदे , शुभम पवार , कल्पेश पाटील , अधिकराव पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते..!

खालील आशयाचे निवेदन दिले आहे

स्मरणपत्र क्रमांक – १

मा. कार्यकारी अभियंता सो.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग , अमळनेर
अमळनेर , जि – जळगाव.

विषय – ढेकु रोड ( प्र. जि. मा. – ५१ ) कॉन्क्रीटीकरण काम सुरु करणेबाबत …!
महोदय,
वरील विषयांन्वये आपणास समस्त ढेकू रोड वासीयांच्या वतीने या पूर्वी दि. १५ मे २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन विनंतीपूर्वक निवेदन देऊन लक्षात आणुन दिले होते कि मागील काही महिन्यापासून ढेकू रोड ( प्र. जि. मा. – ५१ ) या मुख्य रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपात सोडून दिल्यामुळे ढेकू रोड व पिंपळे रोड वरील रहिवास्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून या रस्त्यावरून वापरणाऱ्या ज्येष्ठांपासुन सर्व वर्गातील नागरिकांना पाठीचे व मणक्यांच्या आजाराचे त्रास वाढले असुन वाहनांच्या खराब होण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्याची अवस्था खराब असल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे या सर्व गोष्टींमुळे ढेकु रोड वासियांचा जीवितास धोका वाढला आहे तरी आपण ढेकु रोड या मुख्य रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाचे काम तात्काळ पुर्ण करावे अन्यथा येणाऱ्या काळात समस्त ढेकू रोड परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल व त्यामुळे होणाऱ्या परिणामास आपण व आपला विभाग जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

आपला स्नेहांकित
शाम जयवंतराव पाटील
मा. सभापती – आरोग्य समिती अमळनेर नगरपरिषद, अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!