पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी हरिनाम घोष करीत व दिंडी काढून उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी
आषाढी एकादशी पी.बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हरिनामाचा जयघोष करीत तसेच वारकरी दिंडी काढून अतिशय भक्तीमय व मंगलमय वातावरणात सकाळी मंगल प्रहरी सर्व विद्यार्थी व शिक्षक समवेत साजरी करण्यात आली. लहान मुले व मुली तसेच शाळेमधील समस्त विद्यार्थी शिक्षक हे आज वारकरी संप्रदायाची वेशभूषा परिधान करून आले होते. अतिशय उत्तम आकर्षक व मनमोहक म्हणजे साक्षात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत मुक्ताबाई तर कोणी विठू रुक्माई अशा नानाविध वेशभूषेतील ही मंडळी समस्त अमळनेर नगरीतील जनतेचे लक्ष वेधून घेत होते. हरिनामाचा जयघोष टाळ मृदुंग चिपळी वाजवीत भक्ती गीत कीर्तन भजन गाऊन या दिंडीला एक भक्तिमय उत्तुंग उंची प्राप्त करून दिली होती. शिक्षिका व विद्यार्थ्यांनी चौका चौकात फुगडी खेळून या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवण्याचा प्रयत्न केला. सारा आसमंत विठू माऊलीच्या घोषणांनी निनादून गेला होता. आज असे वाटत होते की साक्षात पंढरी नगरी विद्यालयांमध्ये प्रत्यक्ष स्वरूपात अवतरली असावी.
सदर दिंडी अमळनेरच्या प्रमुख मार्गाने मार्गाक्रमण करून तिची सांगता विद्यालयात करण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी मार्गदर्शन सहकार्य, सर्वतोपरी मदत शाळेचे चेअरमन श्री प्रदीपजी के. अग्रवाल, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी पर्यवेक्षिका एम. एस. बारी, व्ही. पी. बडवे, प्रशांत वंजारी ,योगिषा महाजन, सुवर्ण भावसार, अनंत बागल, तृप्ती शर्मा, पूजा बोरसे, ज्योती जोशी, अनिता मराठे, पूनम पाटील, स्वाती शिंगणे व समस्त शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद वर्ग यांचे लाभले.
धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!