स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे भक्तिरसामय पंढरपूर दर्शन –

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पावन प्रसंगी, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे विठ्ठलभक्तीचा अद्भुत उत्सव अनुभवास आला. संपूर्ण शाळा जणू एक छोटंसं पंढरपूरच बनली होती, जिथे प्रत्येक हृदयात आणि कणाकणात श्री विठ्ठलांची अनुभूती होत होती.
कार्यक्रमाची सुरुवातीला विद्यार्थ्यांनी विविध संतांचे रूपरेखा साकारलेली होती. बाल विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई चे रूप घेऊन एक सुंदर असे नृत्य सादर केले. शाळेतील मोठ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांची संत नामदेवांचे जीवनावर आधारित एक सुंदर अशी नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. प्रमुख मुख्य आकर्षण ठरले ते वाडी चौकातील वेधशाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले रिंगण तसेच टाळ मृदुंगात विठ्ठलाचा केलेला जयघोष. संपूर्ण कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह वाखडण्याजोगा होता. शाळेत जणू वारकरीच अवतरले होते .संपूर्ण कार्यक्रम हा शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनोद अमृतकर सर यांच्या मार्गदर्शनात शिक्षकांनी पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!