स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर – सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत उपविजेता!

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी

पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६४वी जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे पार पडली.

१५ वर्षांखालील गटात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेरच्या मुलांनी शानदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. त्यांनी डॉ. उल्हास पाटील स्कूल सावदा (५-०), सेंट मेरी स्कूल एरंडोल (३-०), शानबाग हायस्कूल सावखेडा (२-०) यांना पराभूत करत सलग चार विजय मिळवले. अंतिम सामन्यात गतविजेता लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूल जामनेरकडून अवघ्या १ गोलच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
संघात सहभागी खेळाडूंनी उत्कृष्ट संघभावना व कौशल्य दाखवत सर्वांचे लक्ष वेधले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. नीरज अग्रवाल, अध्यक्षा श्रीमती सितिका अग्रवाल, मुख्याध्यापक श्री. विनोद अमृतकर तसेच सर्व शिक्षकवृंद व क्रीडा विभागाने खेळाडूंना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

मुख्य प्रशिक्षक जय जाधव, क्रीडा शिक्षक विनय निरंकारी व विभागप्रमुख योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!