शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे येथील उपक्रमशील व अभ्यासू शिक्षक, मराठी लाईव्ह न्युज या वेब पोर्टलचे अतिथी संपादक, सोपान हुना भवरे यांना खान्देश स्तरीय बहिणाबाई चौधरी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
अमळनेर एक्सप्रेस न्युज. ,
शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे येथील उपक्रमशील व अभ्यासू शिक्षक, मराठी लाईव्ह न्युज या वेब पोर्टलचे अतिथी संपादक,
सोपान हुना भवरे यांना खान्देश स्तरीय बहिणाबाई चौधरी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भवरे सर हे कुशल शिक्षक, सडेतोड पत्रकार, संवेदनशील लेखक व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचे लेखन वैचारिक सुस्पष्टता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समतेच्या तत्त्वांनी समृद्ध असून, त्यांनी अनेक विद्यापीठीय शोधनिबंधांतून आपली वैचारिक बैठक सिद्ध केली आहे.
यापूर्वी त्यांना ओबीसी असोसिएशनचा उपक्रमशील पुरस्कार, मणीरत्न पुरस्कार (पुणे) व उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार (दिपनगर) असे अनेक सन्मान मिळाले आहेत.
या यशाबद्दल “मराठी लाईव्ह न्यूज” परिवारातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
शुभेच्छुक
ईश्वर आर महाजन
पत्रकार अमळनेर

