पी. बी .ए .इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी कु. दिक्षिता भामरे हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती .नुकताच या सदर परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी कुमारी दिक्षिता अजय भामरे ही शहरी विभागातून सातव्या अनुक्रमांकाने उत्तीर्ण झाली असून, राज्यातून समस्त पाचवीच्या गटातून तिने 225 वा अनुक्रमांक प्राप्त केला आहे. सदर विद्यार्थिनी इयत्ता सहावी साठी शिष्यवृत्तीधारक ठरली आहे .तिच्या या दैदिप्यमान कामगिरीचे सर्व स्तरातून गुणगौरव होत असून तिने आपल्या ऐतिहासिक कामगिरीच्या माध्यमातून शाळेच्या उज्वल यशस्वी परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. या शिष्यवृत्ती धारकाचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक, जे .एस. देवरे यांच्या हस्ते करण्यात आला .या यशस्वी विद्यार्थिनीस मार्गदर्शन , विषयानुसार प्रबोधन ,शाळेच्या शिक्षिका व्ही .एस. अमृतकर ,सुवर्णा भावसार ,स्वाती माळी, डिंपल देसाई, यांनी केले. ती ज्येष्ठ शिक्षक, कवी ,वार्ताहर अजय भामरे यांची कन्या असून याबद्दल सर्व स्तरावरून तिचे अभिष्ट चिंतन होत आहे .
याप्रसंगी शाळेचे चेअरमन, श्री प्रदीप अग्रवाल ,मुख्याध्यापक, जे. एस .देवरे पर्यवेक्षक ,महेश माळी ,पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही पी बडवे ,प्रशांत वंजारी, श्रावण पाटील, अशोक महाजन व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

