साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वक्त्यांची कार्यशाळा.
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
समाज सुधारक, साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार व कार्य नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची जयंती युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या माध्यमातून याही वर्षी मोठ्या प्रमाणावर साजरी करणार आहे .त्या दृष्टीने वक्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक डी ए पाटील होते, तर अध्यक्षस्थानी प्रा अशोक पवार होते. डॉ प्रा राहुल निकम यांनी सूत्रसंचालन केले ,तर आभार प्रदर्शन अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती ,प्रमुख बापूराव ठाकरे सर यांनी केले.
सौ गायत्री भदाणे माजी मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले विद्यालय, अमळनेर यांनी शिक्षण क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व सुनील महाजन यांनी समाजसेवेसाठी पोलीस विभागात कार्यरत असताना स्वेच्छानिवृत्ती घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार अनुक्रमे प्रा उषा देवरे व निरंजन पेंढारे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सौ भदाने मॅडम व सुनील महाजन यांनी महापुरुषांच्या विचारांच्या प्रचार अभियानात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला.
याप्रसंगी वक्त्यांच्या कार्यशाळेत मिलिंद निकम, अजय भामरे ,अरुण देशमुख ,रियाज मौलाना, सुनील वाघमोडे ,संजय सूर्यवंशी, ए एन घोलप सर, सुनील अहिरराव, पुरुषोत्तम माळी, चिंधू वानखेडे , अनिता संदान शिव,
सुनिता मोरे, भारती कोळी, चेतन जाधव, शेख ताहेर भाई ,उमाकांत ठाकूर आदी मान्यवर वक्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळा पिंपले रोड ,विठ्ठलनगर येथील अभ्यासिकेत आयोजित करण्यात आले होती.


