दस्केबर्डीत प्रथमच सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !…
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
सर्व बहुजनांनी सत्यशोधकाची कास धरा व बोरसे कुटुंबियांचे क्रांतिकारी अभिनंदन : डॉ.सुरेश झाल्टे
सत्यशोधक पद्धतीने विधी करणे ही काळाची गरज : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )
चाळीसगांव प्रतिनिधी –
चाळीसगांव – चाळीसगांव तालुक्यातील दस्केबर्डी गावाचे सामाजिक कार्यकर्ते सहादु अर्जुन बोरसे यांच्या पत्नी व कमलेश साहादु बोरसे यांच्या मातोश्री निसर्गवासी कलाबाई सहादु बोरसे यांचा गंधमुक्त व उत्तरकार्याचा कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने घेण्यात आला. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सत्यशोधक पद्धतीने विधी करत असताना सत्यशोधक समाजाची प्रार्थना सत्यशोधक विधीकर्ते राजकिशोर तायडे यांनी म्हटली.
याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे सचिव डॉ. सुरेश झाल्टे व जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी सार्वजनिक सत्यधर्म विस्तृत मांडुन सत्यशोधक समाजाची कास धरा असा संदेश दिला. चैत्राम भदाणे यांनी मनोगत व्यक्त करून भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली. सत्यशोधक विधीची प्रेरणा विधीकरर्ते भगवान बोरसे, अरुण बोरसे, सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, उपाध्यक्ष दत्ताजीराव जाधव, सचिव डॉ. सुरेश झाल्टे, सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे यांच्याकडून मिळाली. याप्रसंगी सर्व पित्रांना महापुरुषांचे अनमोल ग्रंथ भेट देण्यात आले. बोरसे परिवाराच्या माध्यमातून शेतात, परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी प्रकाश बोरसे, ज्ञानेश्वर बोरसे, प्रमोद बोरसे, बाबासाहेब माळी, मधुकर महाजन, एकनाथ पाटील यासह गावातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य, राजकीय,आप्तेष्ट मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी दस्केबर्डी गावात अनेक सत्यशोधक विवाह, गृहप्रवेश, सत्यशोधक विधीकर्ते भगवान बोरसे सर यांच्या माध्यमातून झालेले आहेत. या कार्यक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधीकर्ते राजकिशोर तायडे सूत्रसंचलन व आभार विधीकर्ते भगवान बोरसे यांनी केले.

